शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"मी जिवंत आहे", 70 वर्षीय महिला 8 वर्षे प्रूफसाठी भटकतेय; लेकीने मृत दाखवून बळकावली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:17 IST

वृद्ध महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावईही तिला शिवीगाळ करतात आणि जेवणही देत ​​नाहीत. बँकेत ठेवलेले तिचे दागिनेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत. 

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील 70 वर्षीय महिला आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत आहे. महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावई यांनी जमिनीसाठी तिला मृत दाखवले. तेव्हापासून ती जिवंत असल्याचा पुरावा घेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत आहे. वृद्ध महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावईही तिला शिवीगाळ करतात आणि जेवणही देत ​​नाहीत. बँकेत ठेवलेले तिचे दागिनेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत. 

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील तांदेरा येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय शांती देवी यांनी सांगितले की, त्यांचे पती बाबुराम यांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्याकडे जमीन होती. यामध्ये त्यांनी काही जमीन त्यांची मुलगी आणि जावयाच्या नावे केली होती. महिलेने सांगितले की, बाबुराम यांनी माझ्यासाठी काही जमीन आणि घरही ठेवलं होतं, परंतु माझी मुलगी आणि जावई यांनी सरकारी नोंदीमध्ये मला मृत दाखवून फसवणूक करून शेती आणि घर दोन्ही बळकावलं.

शांती देवी म्हणाल्या की, मुलगी आणि जावई दोघेही माझा छळ करतात आणि मला घराबाहेर काढू इच्छितात. ते दोघे मला खायलाही देत ​​नाहीत. त्यांनी सांगितले की, 'सरकारी पेपरमध्ये स्वत:ला जिवंत दाखवण्यासाठी मी 8 वर्षांपासून सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे, पण काही उपयोग झाला नाही. माझ्या पतीने त्यांच्या बँक खात्यात काही रोख रक्कमही ठेवली होती. मुलगी आणि जावयाने ते पैसेही काढून घेतले.

परिसरातील अधिकारी या प्रकरणात आरोपींची बाजू घेत असल्याचा दावा शांती देवी यांनी केला. लाच घेऊन जावई आणि मुलीला मदत केली. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांच्या न्यायालयात तक्रारही दाखल केली आहे. शांती देवी शनिवारी तहसील येथील समाधान दिवस तक्रार शिबिरात पोहोचल्या होत्या आणि त्यांनी पुन्हा एकदा अधिकार्‍यांना आपण जिवंत असल्याचं प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश