शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 07:45 IST

Uttar Pradesh News: महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर उत्तर प्रदेशात महिलाच्या वस्त्रांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. तसेच पुरुषांना महिलांचे केसदेखील कापायला नको. वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिला आहे.

लखनौ - महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर उत्तर प्रदेशात महिलाच्या वस्त्रांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. तसेच पुरुषांना महिलांचे केसदेखील कापायला नको. वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिला आहे. गेल्या महिन्यात महिला आयोगाची बैठक झाली होती. त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावांवर राज्य सरकारने कायदा मंजूर करावा, अशी विनंती आम्ही करू, असे आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी सांगितले.

जिम ट्रेनर, टेलर करणार विरोध हा हुकुमशाही प्रस्ताव असल्याची टीका महिलांचे कपडे शिवणारे टेलर आणि जिम ट्रेनर यांनी केली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच ट्रेनर आणि टेलर हे एकत्रित येऊन विरोध करु, असे काहींनी सांगितले. महिला आयोगाने या प्रस्तावाचा पुनर्विचार करायला हवा, अशी मागणीही या व्यावसायिकांनी केली आहे.  

असे आहेत प्रमुख प्रस्ताव■ जिम-योगा सेंटरमध्ये येणाऱ्यांचे ओळखपत्र तपासले जावे.■ स्कूल बसमध्येही महिला सुरक्षा कर्मचारी किंवा शिक्षिका हवी.■ नाट्यकला केंद्रांमध्येही महिला शिक्षक नियुक्त करायला हव्या.■ पुरुष टेलर महिलांचे माप घेऊ शकत नाहीत. माप घेताना सीसीटीव्ही आवश्यक आहे.■ केशकर्तनालयात महिलांचे केस केवळ महिलाच कापू शकतील.■ कोचिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही आणि वॉशरूमची व्यवस्था असायला हवी.■ जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पडताळणी करावी.

महिलांना मिळेल रोजगार महिला आयोगाच्या अध्यक्ष बबिता चौहान यांनी सांगितले की, हा प्रस्ताव महिलांना संरक्षण व रोजगार देणारा ठरेल. सर्व जिममध्ये महिला ट्रेनर व महिलांचे कपडे शिवण्यासाठी महिला टेलर ठेवावे. पूर्वी ब्युटी पार्लरमध्ये महिला कर्मचारीच असायच्या. मात्र, आता तसे नाही. वधुचा मेकअपदेखील पुरुष करतात.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश