शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आप अन् बसपासाठी ही ‘करो या मरो’ची लढाई; एकाचा भाजपविरुद्ध संघर्ष, दुसऱ्या पक्षाची अपरिहार्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:57 IST

भाजपला मदत करण्यासाठी बसपाने मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत हे लपून राहिलेले नाही. इंडियाला बसपाला सोबत घ्यायचे होते. पण, मायावती यांनी नकार दिला. कारण, त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केला होता. 

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय राजकीय पक्ष भाजपच्या विरोधात लढण्यासाठी त्याच्या अस्तित्वाच्या संघर्षात सर्वांत वाईट संकटाचा सामना करीत आहे, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मौन समर्थनासाठी बसपाचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. आप हा ‘इंडिया’सोबत २२ जागा लढवीत आहे, तर बसपाने देशात ४२४ उमेदवार उभे केले आहेत. फरक केवळ इतकाच आहे की, आप अनेक आघाड्यांवर भाजपविरुद्ध लढत आहे, तर बसपा हा पक्ष भाजपच्या मदतीसाठी हे सर्व करीत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, बसपाने दोन जागा जिंकल्या तरी ते नशीबवान असतील. २०१९ मध्ये बसपाने उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेससोबत आघाडी करून १० जागा जिंकल्या होत्या. भाजपला मदत करण्यासाठी बसपाने मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत हे लपून राहिलेले नाही. इंडियाला बसपाला सोबत घ्यायचे होते. पण, मायावती यांनी नकार दिला. कारण, त्यांचे भाऊ आनंद कुमार यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल केला होता. 

नेमकी अडचण काय? - सूत्रांचे म्हणणे आहे की, अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय सोपा करण्यासाठी बसपाने निवडणुकीच्या मध्यात उमेदवार बदलले.- त्यांच्या १० खासदारांपैकी बहुतेक खासदार वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेल्याने मायावतींचा निवडणुकीत रस कमी झाला असल्याचे दिसते. - आकाश आनंद यांना त्यांचा वारस म्हणून केलेली घोषणा मागे घेण्याचे कारणही उघड आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे मायावतींची अपरिहार्यता यात दिसते.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपmayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेश