शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीने दारू पिण्यापासून रोखल्याने पतीला आला राग; उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 11:46 IST

पतीला दारू पिण्यास मनाई करणं एका महिलेला महागात पडलं आहे.

यूपीच्या बांदामध्ये पतीला दारू पिण्यास मनाई करणं एका महिलेला महागात पडलं आहे. पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने गळफास लावून जीव दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यावरून पत्नीचा पतीसोबत नेहमी वाद होत असे.घटनेच्या दिवशीही तिने पतीला रात्री उशिरा दारू पिण्यास मनाई केली होती.

तरुणाने त्यानंतर आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्येची घटना कोतवाली शहरातील शुकुल कुआं परिसरात घडली. येथे राहणाऱ्या एका तरुणाला दारूचं व्यसन होतं. नातेवाईकांनी सांगितलं की, व्यक्ती दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे.

पत्नी दारू पिण्यास सतत नकार द्यायची आणि त्यावरून सतत आपसात वाद व्हायचा. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा कमावलेल्या पैशातून दारू प्यायचा. हा तरुण अचानक एवढं मोठं पाऊल उचलेल याची कल्पनाही नव्हती, असं मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत. तरूण मोलमजुरी करून कुटुंब चालवत असे. याच घटनेबाबत डीएसपी शहर गवेंद्र पाल गौतम यांनी सांगितले की, कोतवाली शहरातील शुकुल कुआं येथे पती-पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश