शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

'उत्तर प्रदेशातून गुंडाराज आणि माफिया राजवट पूर्णपणे संपुष्टात, आता...' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:35 IST

Mafia-Free Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या जनतेने योग्य सरकार निवडलं असून गेल्या ८ वर्षात राज्य प्रगतीपथावर असल्याचा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

गोरखपूर : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये दोन कल्याण मंडपमचे लोकार्पण करताना सांगितले की, आता उत्तर प्रदेशात माफिया प्रवृत्ती पुन्हा कधीही वर्चस्व गाजवू शकणार नाही. गेल्या आठ वर्षांत उत्तर प्रदेशातून गुंडाराज आणि माफिया राजवट पूर्णपणे संपुष्टात आणली असून, आता सामान्य नागरिक, व्यापारी आणि महिला-मुली सुरक्षित आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानबेला आणि राप्तीनगर येथे बांधलेल्या कल्याण मंडपमच्या लोकार्पणावेळी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “आठ वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हते की उत्तर प्रदेश दंगलमुक्त आणि माफियामुक्त होईल. पण आज ही एक वस्तुस्थिती आहे. माफिया प्रवृत्ती मुळापासून उखडून टाकण्यात आली आहे. आता येथे गुंड कुणाच्याही सुरक्षिततेसाठी धोका ठरू शकत नाहीत.”

चांगल्या शासनाचा परिणाम : विकास आणि गुंतवणूकमुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ पासून राज्याने चांगले सरकार निवडले, म्हणूनच हा सकारात्मक बदल शक्य झाला. चांगल्या सरकारचा विचार चांगल्यासाठी असतो. त्यांनी जनतेला प्रश्न विचारला की, 'उत्तर प्रदेशात गुंतवणूक, फोरलेन कनेक्टिव्हिटी, बंद पडलेले खत कारखाने पुन्हा सुरू करणे किंवा नवीन उद्योग उभारण्याबद्दल कोणी विचारही करू शकत नव्हते.' पण आज देशभरात सर्वाधिक गुंतवणूक उत्तर प्रदेशात होत आहे. मोठ्या-मोठ्या कंपन्या येत आहेत, सर्वत्र फोरलेन रस्त्यांचे जाळे पसरत आहे आणि गोरखपूरचा बंद पडलेला खत कारखाना पुन्हा सुरू झाला आहे.

गोरखपूरमध्ये आरोग्य सेवेचा कायापालटयावेळी मुख्यमंत्री थोडे भावुक झाले. ते म्हणाले, आठ वर्षांपूर्वी याच काळात 'इन्सेफेलायटिस' या आजाराने अनेक मुलांचा जीव जात होता. परंतु, 'डबल इंजिन सरकार'ने या आजारावर नियंत्रण मिळवले आणि 'आजारी' मानसिकतेवरही उपचार केले. पूर्वी बीआरडी मेडिकल कॉलेजसारखी मोठी रुग्णालये स्वतःच आजारी होती, पण आता ती रुग्णांना उत्तम सेवा देत आहेत. गोरखपूरमध्ये एम्सची स्थापना झाल्यामुळे आरोग्य सुविधा अधिक चांगल्या झाल्या आहेत.

'सबका साथ, सबका विकास'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांमध्ये योजनांचा लाभ चेहरा किंवा पक्ष पाहून दिला जात होता. मात्र, आता ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानुसार सर्वांना लाभ दिला जात आहे. गेल्या आठ वर्षांत ५७ लाख गरजूंना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. शहराच्या दक्षिणेकडील रामगढताल आणि उत्तरेकडील चिलुआताल आता पर्यटन केंद्रे बनली आहेत.

गोरखपूरमध्ये सुरू असलेल्या विकासामुळे आता तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही, तर त्यांना घरच्या जवळच नोकरी मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी २०२४ पर्यंत 'विकसित भारत'च्या संकल्पाप्रमाणेच 'विकसित उत्तर प्रदेश' आणि 'विकसित गोरखपूर'चा संकल्प करण्याचे आवाहन जनतेला केले. कल्याण मंडपमसारख्या अभिनव प्रकल्पाची सुरुवात गोरखपूरमध्ये झाली असून, आता हे मॉडेल इतर शहरांमध्येही स्वीकारले जात आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश