शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:47 IST

Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे.

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी २ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी भोले बाबांच्या सत्संगाला अनेक राज्यांतून महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यात लहान मुलांसह १२१ जणांना जीव गमवावा लागला. 

या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली आहे. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.  या दुर्दैवी घटनेचे मुख्य कारण स्पष्ट करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भोले बाबांच्या सत्संगात त्यांना स्पर्श करण्याच्या शर्यतीत भक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाली. 

कथावाचक मंचावरून खाली उतरत असताना महिलांचा एक गट त्यांना हात लावण्यासाठी पुढे गेला आणि त्याचवेळी ही घटना घडली. घटनास्थळी सेवा कर्मचारीही उपस्थित होते, त्यांच्याशी बाचाबाची झाली. मात्र, या घटनेतील व्यक्तींचा मृत्यू होण्यापूर्वीच सेवा कर्मचारीही तेथून निघून गेले, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार मृत्युमुखी पडलेल्यांना ४ लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची मदत करणार आहे. तसेच, यापेक्षा मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केले असून अशी घटना घडली नाही, असे सांगत आम्ही कुंभसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. 

३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत - योगी आदित्यनाथमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, "मी घटनास्थळी भेट दिली आणि अपघाताच्या कारणांची प्राथमिक व्यवस्था पाहिली आणि आमचे ३ मंत्री कालपासून तिथे तळ ठोकून आहेत. मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक देखील उपस्थित आहेत. कालच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकारी तिथे उपस्थित असून या संपूर्ण घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून प्राथमिक तपासानंतर पुढील कारवाई करू." 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAccidentअपघात