शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सीमा-अंजू प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 21:42 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सीमा आणि अंजूबद्दल भाष्य केले आहे.

सध्या देशात दोन लव्ह स्टोरीजची जोरदार चर्चा होत आहे. एक सीमा हैदरची आहे, जी आपला भारतीय प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला आली आहे, तर दुसरी लव्ह स्टोरी भारतीय अंजूची आहे, जिने पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा येथे जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सीमा आणि अंजूबद्दल भाष्य केले आहे.

योगी आदित्यनाथ यांना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, सीमा हैदरने तुम्हाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानात न पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, काही लोकांनी PUBG च्या माध्यमातून या प्रेमाला रिव्हर्स लव्ह जिहाद असे नाव दिले आहे. याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे. तपासातून जो अहवाल समोर येईल, त्यानुसार योग्य तो विचार केला जाईल. याचबरोबर, पाकिस्तानला गेलेली भारतीय महिला अंजूबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, यावरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे. हे प्रकरण दोन देशांशी संबंधित आहे. तपास यंत्रणा यावर काम करत आहेत.

दरम्यान, सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे, असा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अलीकडेच सीमा, सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती.  दुसरीकडे, वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचे प्रियकर नसरुल्लासोबत अंजूचे लग्न झाल्याची बातमी आहे. तिने धर्मांतर केल्याचीही चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे, तर अंजू आपल्या मुलांना आणि पतीला सोडून पाकिस्तानला गेली आहे. सीमा हैदर सध्या सचिनच्या कुटुंबासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे, तर अंजूचे नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओमध्ये अंजू तेथील पारंपारिक पोशाखात दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती प्री-वेडिंग शूट करताना दिसत आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश