शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 07:01 IST

घटनास्थळी मच्छिमार नसते तर तरूणाला जीव गमवावा लागला असता म्हणूनच रागात त्यांनी त्याला मारहाण केली.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. इथे आईचा ओरडा सहन न झाल्याने संतापलेल्या तरूणीने पुलावरून नदीत उडी मारली. तरूणीने उडी मारल्याचे समजताच तिच्यासोबत असलेल्या तरूणाने देखील त्याच मार्गाने जात नदीत उडी घेतली. खरे तर हे प्रेमी युगुल असल्याचे सांगितले जात आहे. घरी आईशी वाद झाल्यामुळे संबंधित तरूणी संतापली होती आणि याच रागात तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

'क्राईम तक'ने दिलेल्या माहितीनुसार, सुलतानपूरमधील ही घटना एका शुल्लक कारणावरून घडली. तरूणीचा तिच्या आईसोबत वाद झाला होता. मग आईने तिला ओरडताच ती संतापली अन् तेथील पुलावरून गमती नदीत उडी मारली. मुलीला उडी मारताना पाहून तिच्या प्रियकराने देखील नदीत उडी मारली. हे पाहताच काठावर उपस्थित मच्छिमारांनी दोघांचा जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. मच्छिमारांनी दोघांचे प्राण वाचवले. दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती.

मच्छिमार बनले देवदूत सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसते की, मच्छिमार या प्रेमी युगुलाला बाहेर काढत आहेत. याशिवाय त्यातील काही जणांनी संबंधित तरूणाला चोप दिला. नंतर या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडल्याचे कळते. सुलतानपूरमध्ये एका तरुण आणि तरुणीचा नदीत उडी मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघांचा जीव वाचवल्यानंतर एक मच्छीमार उडी मारणाऱ्या तरुणाला कानाखाली मारताना दिसत आहे. घटनास्थळी मच्छिमार नसते तर तरूणाला जीव गमवावा लागला असता म्हणूनच रागात त्यांनी त्याला मारहाण केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट