शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गंगेत पवित्र स्नानासाठी निघालेल्या ७ बालकांसह २४ जणांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:34 IST

उत्तर प्रदेशात अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून तलावात कोसळली 

कासगंज : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी एक ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ती एका तलावात पडली. पटियाली-दरियावगंज रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेत ट्रॅक्टर-ट्रॉलीतील सात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक गंगा नदीवर पवित्र स्नानासाठी चालले होते. तसेच पंधरा ते वीस जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, चालक दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना ही ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून एका तलावात पडली. सात बालके, आठ महिलांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. जैथारा येथून या लोकांनी प्रवासाला सुरुवात केली होती. 

या दुर्घटनेतील मृतांची शवचिकित्सा केल्यानंतर ते मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले. ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी सर्व व्यवस्था करा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या घटनेचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांना तलावाभोवती एकच गर्दी केली होती. पोलिसांनी मदतकार्यात परिसरातील नागरिकांची मदत घेतली. (वृत्तसंस्था) 

सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदतअपघातातील मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी ५० हजारांची मदत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली. 

टॅग्स :Accidentअपघात