शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 06:11 IST

गोरखपूरमध्ये २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला आहे. ९५ वर्षांत असे प्रथमच घडले आहे.

राजेंद्र कुमार/एस.पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कलखनौ/पाटणा: उत्तर प्रदेशात गत पाच दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ११ जिल्ह्यांना पुराने वेढले आहे. गत पाच दिवसांत ३० जिल्ह्यांत घरे कोसळून आणि विजा पडून २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर नेपाळमधील पावसामुळे रविवारी पहाटे पाच वाजता कोसी, वीरपूरमधून ६,६१,२९५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. ते ५६ वर्षांतील सर्वाधिक आहे. त्यामुळे बिहार राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोरखपूरमध्ये २४ तासांत १५३ मिमी पाऊस झाला आहे. ९५ वर्षांत असे प्रथमच घडले आहे. यापूर्वी १९३० मध्ये २४ तासांत असा मोठा पाऊस झाला होता. उत्तर प्रदेशात हजारो एकरवरील पिके नष्ट झाली आहेत. पावसामुळे अवध भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अवधच्या आंबेडकरनगरमध्ये भिंत कोसळून दोन वृद्धांसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. सुल्तानपूरमध्ये घर कोसळून व वीज पडून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. लखनौमध्ये गोमती नदीची पाणीपातळी वाढली आहे, तर श्रावस्ती आणि राप्ती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी पूरस्थितीची माहिती घेतली आणि मदतकार्याच्या सूचना दिल्या. नेपाळमधील मुसळधारेमुळे कुसुमा नदी दुथडी वाहत आहे. ते पाणी राप्तीमध्ये सोडले जात आहे. सिद्धार्थनगर, कुशीनगर, महराजगंजमध्ये अनेक गावांत पाणी शिरले आहे. सोनौलीहून काठमांडू आणि पोखरा येथे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

नेपाळच्या पावसामुळे बिहारमध्ये नद्यांचे रौद्र रूपnनेपाळ आणि सीमावर्ती राज्यात सातत्याने होत असलेल्या जोरदार पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती आहे. नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २० जिल्ह्यांत पुराचा अलर्ट जारी केला आहे. nहवामान विभागाने आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. १३ जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. १४० गावांमध्ये पाणी शिरले आहे. १.४१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. कोसी नदीचे पाणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्यावरून पूरस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :floodपूर