शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

10 KG सोनं, 25 KG चांदी अन्...; भक्तांनी एका महिन्यात रामललाच्या दरबारात काय-काय अर्पण केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:24 IST

एकट्या 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणारे भक्त प्रभू रामचंद्रांना काहीना काही अर्पण करत आहेत.

अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. पहिल्या दिवशी केवळ प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाच राम ललांचे दर्शन घेण्याची परवानगी होती. यानंत 23 जानेवारीपासून सर्वांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. तेव्हापासून येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा दिसत आहेत. एकट्या 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी येणारे भक्त प्रभू रामचंद्रांना काहीना काही अर्पण करत आहेत.

अंबानी कुटुंबानं अर्पण केले 10 कोटी रुपये -गेल्या एका महिन्यात रामललांच्या दरबारात काय आले? यासंदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यालाही असेल. तर पहिल्य दिवशी अंबानी कुटुंबाने रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपयांची देणगी दिली होती. एवढेच नाही, तर माध्यमांतील वृत्तांनुसार, अंबानी कुटुंबाने एकूण 10 कोटी रुपयांहून अधिकची देणगी राम मंदिराला दिली आहे. याशिवाय इतरही अनेक अब्जाधीशांनी राम मंदिरात मोठ-मोठ्या देणग्या दिल्या आहेत.

एका महिन्यात काया काय आलं? -गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी रामललांचे दर्शन घेतले असून एकूण 25 कोटी रुपयांहूनही अधिकचे दान केले आहे. हे दान मंद‍िर पर‍िसरातील दान-पात्र आणि दान काउंटरवर प्राप्‍त झाले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राम भक्तांनी या देणग्या रोख, चेक आणि ड्राफ्टच्या स्वरुपात दिल्या आहेत. दुसऱ्या देशांमधून आलेल्या राम भक्तांकडून देण्यात आलेल्या देणगीचा समावेश यात नाही. याशिवाय, भाविकांनी सोने-चांदी आणि रत्‍नांचे दानही अगदी खुल्या हाताने केले आहे.

भक्तांनी मुक्त हस्ते सोनं-चांदीही केलं अर्पण -प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी मुक्त हस्ते सोने-चांदीही अर्पण केलं आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, या एका महिन्यात 25 किलो चांदी आणि 10 किलो सोने भक्तांनी रामलला यांना अर्पण केलं आहे. या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, हार, छत्री, रथ, बांगड्या आदी. याशिवाय इतर वस्तूंमध्ये खेळणी, दिवे, उदबत्ती स्टँड, धनुष्यबाण आदींचाही समावेश आहे. याच बरोबर भाविकांनी सोन्या-चांदीची भांडी आणि रत्न देखील अर्पण केले आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश