वडगाव साठवण तलावाचे होणार पुन्हा सर्वेक्षण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:30+5:302021-01-25T04:33:30+5:30

ज्ञानराज चौगुले : बैठकीत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय लोहारा : तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील साठवण तलाव या प्रकल्पास सन २००० ...

Wadgaon storage lake to be re-surveyed ... | वडगाव साठवण तलावाचे होणार पुन्हा सर्वेक्षण...

वडगाव साठवण तलावाचे होणार पुन्हा सर्वेक्षण...

googlenewsNext

ज्ञानराज चौगुले : बैठकीत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

लोहारा : तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील साठवण तलाव या प्रकल्पास सन २००० साली जलसंपदा विभागाद्वारे मंजुरी देण्यात आली होती. यानंतर यासाठी भूसंपादन प्रक्रियाही बऱ्याच अंशी पूर्ण होऊन जवळपास ७० टक्के लोकांना भूसंपादनापोटी मावेजाही मिळाला. त्यामुळे या साठवण तलावाचे पुन्हा सर्वेक्षण करून निधीची तरतूद करून घेणार असल्याची माहिती आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिली.वडगाव (गांजा) येथील साठवण तलावास काही शेतकऱ्यांचा विरोध केल्यामुळे हे काम अद्याप सुरू झाले नव्हते. तसेच मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार १०१ ते ६०० हेक्टर साठवण क्षमता असलेल्या पाणीसाठ्यांचे प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. यानुसार वडगाव (गांजा) साठवण तलाव हा प्रकल्पही जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास याठिकाणी १.६३ दलघमी पाणीसाठा होऊन सुमारे ११ चौ. कि. मी. क्षेत्रातील जवळपास ३५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. ही गरज ओळखून आ. ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सदर प्रकल्पाचे पूर्ण सर्वेक्षण करून उर्वरित भूसंपादन करून नव्याने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय झाल्याचे आ. चौगुले म्हणाले. तसेच यासाठी लागणारा निधी जलसंधारण विभागाकडून मंजूर करून घेण्याची ग्वाही आ. ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, कार्यकारी अभियंता, जिल्हा जलसंधारण अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी, सीना-कोळेगाव प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता आदी उपस्थित होते.

Web Title: Wadgaon storage lake to be re-surveyed ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.