वडगावात शिवसेनाच ठरली ‘भारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:41+5:302021-01-20T04:32:41+5:30

उस्मानाबाद - शहराला लागून असलेल्या वडगाव (सि.) ग्रामपंचायतीची निवडणूक सेनेसह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. दाेन्हीकडूनही जाेरदार प्रचार ...

Shiv Sena becomes 'heavy' in Wadgaon | वडगावात शिवसेनाच ठरली ‘भारी’

वडगावात शिवसेनाच ठरली ‘भारी’

googlenewsNext

उस्मानाबाद - शहराला लागून असलेल्या वडगाव (सि.) ग्रामपंचायतीची निवडणूक सेनेसह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. दाेन्हीकडूनही जाेरदार प्रचार करण्यात आला. आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडल्या. निवडणूक आखाड्यात शिवसेनाच भारी ठरली. विराेधकांच्या पारड्यात अवघ्या तीन जागा गेल्या. तर दुसरीकडे सेना पॅनल प्रमुखांच्या साैभाग्यवतींना पराभवाचा सामना करावा लागला.

वडगाव सिद्धेश्वर हे गाव उस्मानाबाद शहराला लागून आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना पुरस्कृत अंकुश माेरे यांचा सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनल व नितीन पाटील यांच्या सिद्धेश्वर जनविकास आघाडीत थेट दुरंगी लढत झाली. दाेन्ही पॅनलकडून प्रचारात झाेकून दिले हाेते. आराेप-प्रत्याराेपही माेठ्या प्रमाणात झाले. निकाला अंती या अटीतटीच्या लढतीत आठ जागा पटकावित शिवसेनाच भरी ठरली. या पॅनलच्या विजयी उमेदवारांत लक्ष्मी राजेंद्र जाधव, केवळ नवनाथ पांढरे, महानंदा रमेश म्हेत्रे, सूर्यकांत महादेव मुळे, लक्ष्मीकांत श्रीमंत हजारे, सविता सीताराम वाडकर, बळीराम दिगंबर कांबळे, देवकन्या जयराम माेरे यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात विद्यमान सत्ताधारी यशस्वी झाले असतानाच पॅनल प्रमुख माेरे यांच्या साैभाग्यवतींना मात्र पराभवाला सामाेरे जावे लागले.

तर प्रतिस्पर्धी सिद्धेश्वर जनविकास आघाडीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. यात पॅनल प्रमुख नितीन पाटील यांच्यासह यशवंत जानराव व विशाखा विनाेद जानराव या तीन जागांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलचे अंकुश माेरे, सेनेचे पंचायत सिमती सदस्य गजेंद्र जाधव तर सिद्धेश्वर जनविकास आघाडीकडून नितीन पाटील, अतुल वारकड यांनी प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.

Web Title: Shiv Sena becomes 'heavy' in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.