व्यापारी संकुलाला महापुरुषांची नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:47+5:302021-01-20T04:32:47+5:30

कळंब : येथील नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नगर परिषदेच्या तीन व्यापारी संकुलाच्या नामकरणासह २४ ठराव मंजूर ...

The names of the great men of the merchant complex | व्यापारी संकुलाला महापुरुषांची नावे

व्यापारी संकुलाला महापुरुषांची नावे

googlenewsNext

कळंब : येथील नगर परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नगर परिषदेच्या तीन व्यापारी संकुलाच्या नामकरणासह २४ ठराव मंजूर करण्यात आले.

नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत जुन्या बसस्थानकातील नवीन व्यापारी संकुलला स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल, आठवडी बाजार मैदानातील दोन्हीही व्यापारी संकुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते नवीन सराफ लाइन या व्यापारी संकुलाला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

या नामकरणाला शिवसेनेने आक्षेप घेऊन याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे त्यांची यासंदर्भात काय भूमिका राहील, याबाबत नागरिकांत उत्सुकता होती; मात्र सेनेचे सहापैकी दोनच सदस्य बैठकीला हजर होते. त्यांनीही या ठरावाला विरोध केला नाही. त्यामुळे शहरातील या तीन संकुलाला महापुरुषांची नावे देण्याची शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यात सत्ताधारी मंडळीला यश आले.

Web Title: The names of the great men of the merchant complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.