कोरोनाचा कहर : उमरग्यात ८१ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:41+5:302021-04-21T04:32:41+5:30

उमरगा : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मंगळवारी आतापर्यंत सर्वांत जास्त ८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, ...

Havoc of Corona: 81 affected in age | कोरोनाचा कहर : उमरग्यात ८१ बाधित

कोरोनाचा कहर : उमरग्यात ८१ बाधित

googlenewsNext

उमरगा : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मंगळवारी आतापर्यंत सर्वांत जास्त ८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर तिघांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा ८८ झाला असून, बाधितांची संख्या तीन हजार २१२ झाली आहे. यामधील दोन हजार ५५६ रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत, तर सध्या ५६४ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत उमरगा येथे आणखी तीन खासगी रुग्णालयात कोरोना रुग्ण दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या १०६ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये ४०, तर २४ स्वॅबच्या अहवालात १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. तसेच मुरूम ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या ३ स्वॅबचा अहवाल मंगळवारी आला. यामध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या ७३ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या.

तालुक्यातील ग्रामीण भागात ६२ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामधून आठजण कोरोनाबाधित आढळले. दरम्यान, तालुक्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या उपजिल्हा रुग्णालयात ९३, ईदगाह कोरोना केअर सेंटरमध्ये २५, खासगी रुग्णालयात ५३, मुरूम कोविड केअर सेंटरमध्ये ६५, तर होम आयसोलेशनमध्ये ४१ रुग्ण असल्याची माहिती डॉ. प्रवीण जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके व मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांनी दिली.

येथेही होणार उपचार

उमरगा शहरात मंगळवारी आणखी तीन खासगी रुग्णालयांना कोविड रुग्ण दाखल करून घेण्याची परवानगी मिळाली आहे. यात डॉ. विजय पाटील रुग्णालयात १०, डॉ. अभय शिंदे व डॉ. नरवडे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी २०, तर डॉ. खिचडे हॉस्पिटलमध्ये १० बेडची सोय होणार आहे. याशिवाय श्री छत्रपती शिवाजी कॉलेज येथील कोरोना केअर सेंटर चालू झाले असून, तिथे ५०-६० लोकांची सोय होऊ शकते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी दिली.

Web Title: Havoc of Corona: 81 affected in age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.