शेत रस्त्याने घेतला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:13+5:302021-04-10T04:32:13+5:30

वाशी : जिल्हाभर सुरू असलेल्या शेत रस्ता अतिक्रमणमुक्त मोहिमेला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. याअंतर्गत शनिवारी वाशी शिवारातील एक ...

The farm was taken by road | शेत रस्त्याने घेतला मोकळा

शेत रस्त्याने घेतला मोकळा

googlenewsNext

वाशी : जिल्हाभर सुरू असलेल्या शेत रस्ता अतिक्रमणमुक्त मोहिमेला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. याअंतर्गत शनिवारी वाशी शिवारातील एक किलोमीटरपर्यंतचा शेत रस्ता मोकळा करण्यात आला. या भागातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरून गरजवंत शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेत रस्ता करण्यासाठी समर्थता दर्शवली होती. त्यानुसार येथील तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी केली. सहमती पत्रावर स्वाक्षरी केलेल्या शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी आवश्यक असलेला १७ फूट रुंदीचा १ किलोमीटर रस्ता मोकळा करून दिला.

याप्रसंगी नायब तहसीलदार स्नेहलता पाटील, मंडलाधिकारी दत्तात्रय गायकवाड, तलाठी अशोक राठोड, समीर पुट्टेवाड, भारती गजानन, संजय कवडे, तुकाराम शिंदे, ॲड. दिलीप शेरकर, टिनू बारगजे, शेतकरी अशोक चेडे, जगदीश पाटील, दर्शन पाटील, गोरख कुदळे, सचिन कुदळे, किसनराव टकले, चंद्रकांत उंदरे, भारत चेडे, किरण चेडे, पांडुरंग चेडे, कैलास चेडे, नानासाहेब चेडे, दिगंबर चेडे, हंसराज कवडे, गणेश बनसोडे उपस्थित होते.

Web Title: The farm was taken by road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.