सात वर्षांपासून फरार असलेला आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:43+5:302021-01-20T04:32:43+5:30

२३० कारवायांत ५० हजारांचा दंड वसूल उस्मानाबाद : माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर ...

Arrapee arrested for absconding for seven years | सात वर्षांपासून फरार असलेला आराेपी अटकेत

सात वर्षांपासून फरार असलेला आराेपी अटकेत

googlenewsNext

२३० कारवायांत ५० हजारांचा दंड वसूल

उस्मानाबाद : माेटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाभरातील अठरा पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेकडून २३० वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दंडापाेटी त्यांच्याकडून सुमारे ५० हजार ८०० रुपये वसूल करण्यात आल आहेत. कारवाईची ही माेहीम यापुढेही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

लाेहारा : येथील जुन्या पंचायत समिती कार्यालयासमाेरील पत्र्याच्या शेडमधील जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. या कारवाईत जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी राहुल काेकणे, शिवहार नारायणकर, विकास थाेरात, हुकुम ईनामदार, अश्विनी माळवदकर, विशाल काेकणे (सर्व रा. लाेहारा) यांच्याविरुद्ध लाेहारा ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहेे.

अवैध दारूविक्री, गुन्हा दाखल

उस्मानाबाद : तालुक्यातील काेंड येथे दाेन वेगवेगळ्या ठिकाणी ढाेकी पाेलिसांनी १८ जानेवारी राेजी छापा मारला. या कारवाईत २५ लीटर अवैध गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी काेंड येथील राजाभाऊ भुजबळ, रहीम मुलानी, विनाेद जाधव, सिद्धेश्वर जाधव यांच्याविरुद्ध ढाेकी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Arrapee arrested for absconding for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.