- रणजितसिंह डिसले प्राथमिक शिक्षक, परीतेवाडी शाळा
मुलांनो, आता दोन महिने होऊन गेले. महाराष्ट्रातील सर्वच सरकारी शाळांना सुट्टीच आहे. एवढी मोठी सुट्टी मिळाल्याने बच्चे कंपनी खुश असायला हवी होती. पण घरात बसून सर्वांनाच कंटाळा आलाय. सुट्टी म्हटल कि टीव्ही पहायला , मोबाईल मध्ये गेम्स खेळायला अनेकांना आवडत. पण मोबाईलमधील गेम्स तरी किती दिवस खेळणार? ते सुद्धा आता नकोसे झाले आहेत. आता जून महिना सुरु होईल आणि सगळ्यांना शाळा सुरु होण्याचे वेध लागतील. पण कोरोनामुळे जून मध्ये शाळा उघडतील का, हे मात्र सांगता येत नाहीये. काहीजण म्हणतात कि शाळा सुद्धा आता ऑनलाईन भरणार आहेत. कशी असते ही ऑनलाईन शाळा? खरंच असं शाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का? यासाठी माझायाकडे कोणती साधनं असावी लागतील? माङो मित्र असतील का या ऑनलाईन शाळेत? - असे खूप सारे प्रश्न तुम्हांला पडले असतील.