तरीही अजून खेळायला का नाही जायचं बाहेर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:15 PM2020-06-10T17:15:55+5:302020-06-10T17:16:53+5:30

अनलॉक होतंय ना आता..

unlock- why not play outside? | तरीही अजून खेळायला का नाही जायचं बाहेर?

तरीही अजून खेळायला का नाही जायचं बाहेर?

Next
ठळक मुद्देअजून थोड्या दिवसात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होईल...

मी घराबाहेर खेळायला जाऊ का विचारलं तर आई नाही म्हणते, आमच्या जवळची हॉटेल्स आता सुरु झाली आहेत पण तिथून काहीही मागवायला बाबा नाही म्हणतो, असं का? - जान्हवी देशपांडे, पुणो 

- जान्हवी, आपण आता लॉक डाऊनमधून बाहेर येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. याला आपली सरकारने अनलॉक 1 असं नाव दिलेलं आहे. पण त्याचबरोबर लोकं जसजशी बाहेर पडायला लागतील, एकमेकांच्या संपर्कात येतील कोरोनाचा संसर्ग जास्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपण काही सतत घरात  बसू शकत नाही. कधी ना कधी तरी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे, तशी देश म्हणून आपण केली  आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोरोनाचा धोका टळला आहे. म्हणूनच आता गरज नसताना बाहेर जाणं टाळणं आवश्यक आहे. तुम्हा मुलांना खूप कंटाळा आलेला आहे, पण त्याला काही पर्याय नाहीये. अजूनही मुलांनी घराबाहेर जाणं तितकंसं सुरक्षित नाहीये. म्हणूनच तर शाळाही सुरु करण्याविषयी अजून   निर्णय झालेला नाही. 


आता राहता राहिला बाबांचा मुद्दा तर हॉटेलांना पार्सल्स द्यायची परवानगी दिलेली आहे पण जर थोडे दिवस बाहेरचे पदार्थ आपण टाळूया ना. म्हणजे हॉटेल्स चालवणारे सगळी काळजी घेतच आहेत, सरकारने जे नियम घालून दिले आहेत त्यानुसारच सगळं सुरु आहे, पण बाबांना जर काळजी वाटत असेल तर तीही बरोबरच आहे. आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. अजून थोड्या दिवसात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होईल आणि मग तुला बाहेरही जाता येईल आणि आवडीच्या हॉटेलमधलं खाताही येईल. 

Web Title: unlock- why not play outside?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.