शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

तुम्ही सतत गेम खेळत असाल, तर 'हा' प्रश्न तुम्हालाही पडत असेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 08:00 IST

‘त्या’ चॅट बॉक्सशी बोलायचं का?

ठळक मुद्देयात धोका आहे असंच गृहीत धरलेलं बरं, नाही का?

मी जो गेम खेळतो त्यात काही चॅट बॉक्स पण असतात. तिथे खूप अनोळखी लोकं असतात. त्यांच्याशी बोलणं सेफ असतं का?निरंजन पाठक, पुणो 

- निरंजन अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला  आहेस. मुळात गेमिंग करताना तू इतका छान अलर्ट आहेस हेच मस्त आहे. तर आता लक्षात घे हे गेमिंगमधले चॅट बॉक्स आणि तिथली माणसं यांच्याशी बोलणं अनेकदा धोकादायक असू शकतं. पण तुला गेममध्ये काही तरी जिंकायला, किंवा तुमचा गेम पुढे जाण्यासाठी बोलणं आवश्यक असू शकतं. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करताना ती व्यक्ती जर तुला योग्य वाटली नाही, त्या व्यक्तीची भाषा, त्या भाषेत जर शिव्या असतील, किंवा इतर काहीतरी चुकीच्या गोष्टी ती व्यक्ती लिहीत असेल तर चॅटिंग बंद केलेलं बरं.  अनेकदा मुलांच्याबाबत फसवणुकीच्या बाबत ज्या घटना घडतात त्यात, समोरची व्यक्ती चॅटिंग करता करता कौटुंबिक, घरातल्या माणसांच्या बँकेचे डिटेल्स अशा गोष्टी विचारत असते असं दिसून आलं आहे. हे तपशील कुठल्याही अनोळखी माणसांना कधीही द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेव. शिवाय बँक डिटेल्स तर ओळखीच्या माणसांनाही आईबाबांना न विचारता अजिब्बात द्यायचे नाहीत. आणि हो, गेमिंग करत असताना अनेकदा अनेक विंडोज ओपन होतात. पॉप अप्स येतात, आपल्याला माहित नसलेल्या साईटवर चुकूनही जायचं नाही. यात धोका असू शकतो. 

त्यामुळे चॅटिंग करताना फक्त गेमिंगसाठी आवश्यक तितकंच बोलायचं, गरज असेल तरच बोलायचं. गेम संपला कि चॅटिंग ताबडतोब बंद करायचं. कारण समोरची व्यक्ती नक्की कोण आहे हेही आपल्याला ठाऊक नसतं अशावेळी यात धोका आहे असंच गृहीत धरलेलं बरं, नाही का?