कबुतर हा आपल्या सर्वाच्या अतिशय परिचयाचा पक्षी. अनेक ठिकाणी आपल्याला तो दिसतो. या पक्ष्याला अनेक जण पाळतातही.पण ब:याचदा या पक्ष्यांचे पंख कापलेले असतात. पूर्ण नाही, पण काही प्रमाणात. त्यामुळे त्यांना फार लांब उडून जाता येत नाही. पण असं करू नये. पक्ष्यांना पिंज:यात कोंडून ठेवणं, त्यांचे पंख कापणं. हे अतिशय क्रूरपणाचं आहे. कबुतरांना वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. कोणी त्यांना कबुतर म्हणतं, कोणी त्यांना पारवा, तर कोणी होला. उष्ण प्रदेशांत हे पक्षी सामान्यत: जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यांचा गुटुरगुंùù गुटुरगुंùù असा खर्जातून काढलेला आवाज आपल्याला नेहेमीच आकर्षून घेतो. याच पक्ष्याचा व्यायाम आज आपल्याला करून पाहायचा आहे. वेगवेगळ्या तीन-चार पद्धतीनं हा व्यायाम करता येतो. त्यातील सोपी पद्धत आज आपण बघणार आहोत. म्हणायला सोपी असली, तरी ती तितकीशी सोपी नाही, हेही लक्षात घ्या.योगाच्या आसनांतही यांचा समावेश केलेला असतो.आपल्या आजच्या या व्यायामाचं नाव आहे, ‘पिजन लंज’.
- तुमचीच गुटुरगुंùù’,ऊर्जा