ही गोष्ट आहे रिचर्ड तुरेरेची. तो केनियातल्या नैरोबी नॅशनल पार्कच्या दक्षिणोकडे एका छोट्या गावात राहतो. गाव जंगलाच्या अगदी जवळ. वन्य प्राणी आणि स्थलांतरित ङोब्रे त्याच्या गावाच्या आजूबाजूला नेहमी फिरतात. मग त्यांच्या पाठीमागे शिकारीसाठी सिंह ही येतात. ङोब्र्यांच्या बरोबर गावातली गाईगुरंही शिकार होतात. रिचर्ड मसाई जमातीचा आहे. गुरांची शिकार कशी थांबवायची हा सगळ्याच जमातीपुढे मोठा प्रश्न होता. एकदिवस त्याचाही लाडका बैल शिकार झाला. त्यांच्या घरात तेवढा एकच बैल होता. आता काय करायचं? सिंहांच्या दहशतीवर उपाय शोधला पाहिजे असं त्याला फार वाटायला लागलं. पण तो चिमुरडा मुलगा. करणार काय? पण त्याने हार मानली नाही. त्याला हे माहित होतं कि सिंह आगीला घाबरतात. म्हणून मशाल दाखवून त्यांना पळवून लावायचा त्याने विचार केला. पण मशालीच्या उजेडात सिंहांना गाव अधिकच स्पष्ट दिसायला लागलं आणि त्यांचा फायदाच झाला. आता काय?मग त्याने बुजगावणं लावलं. पहिल्या दिवशी सिंह पळून गेले. पण दुस?्या दिवशी धीट झाले. बुजगावणं जागचं हालत नाही म्हटल्यावर सिंहांची भीती गेली. आता?