शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

धडपडलात तर ही एक गोष्ट आहे का तुमच्या घरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 16:47 IST

फर्स्ट एड किट

ठळक मुद्देकधीही बघा, तुम्हाला कायम कुठेतरी खरचटलेलं असतं

तुमच्या वयात जगातल्या सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात कॉमन गोष्ट कुठली असते माहितीये का? म्हणजे शाळा, अभ्यास, आईवडिलांची बोलणी खाणं वगैरे गोष्टींबद्दल नाही विचारलं. असा कुठला स्वभावधर्म किंवा कॅरॅक्टरिस्टिक असतो जो संपूर्ण जगातल्या तुमच्या वयाच्या मुलांमध्ये असतोच असतो?तर धडपडणे !खरंच,  तुम्ही कधीही तुमचे मित्रमैत्रिणी बघा. कायम कुठेतरी खरचटलेलं असतं, गुढगे फुटलेले असतात, काटे टोचलेले असतात, चटके बसलेले असतात, ठेचा लागलेल्या असतात! दर दोन तीन दिवसांनी काही ना काहीतरी आयडिया करून कुठेतरी काहीतरी लागलेलं असतंच. पण त्याला काही इलाज नाही. वेंधळेपणा करणो, सरळ चालतांना रस्त्यातला दगड न दिसून त्याला अडखळणो हे सगळे तुमच्या वयाचे कारनामे आहेत. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं हे धडपडणं कमी होत जातं. पण ते नंतर!! आत्ता त्याचं काय करायचं?तर आत्ता आपण धडपडलो तर निदान त्यासाठी लागणारं फस्र्ट एड किट घरात बनवून ठेवायचं. त्यात आपल्याला काय काय लागू शकेल याचा विचार करायचा. म्हणजे स्वच्छ कापूस, आयोडीन, बँडेड, कॉटन बँडेज, सोफ्रामायसिन सारखं एखादं मलम, बरनॉल सारखं भाजण्यावरचं मलम, काटा गेला तर तो काढण्यासाठी मोठी सुई, हात किंवा पाय मुरगळला तर तो बांधून ठेवण्यासाठी क्रेप बँडेज, मग ते गरम ठेवण्यासाठी आयोडेक्स किंवा नायझरसारखं मलम, शिकायला गरम पाण्याची पिशवी इत्यादी.

जितका विचार कराल तितक्या वस्तू तुम्हाला आठवतील. यातल्या अनेक वस्तू घरात असतील, काही मेडिकल स्टोअरमधून विकत आणायला लागतील. पण हे सगळं सामान एकत्र करून, एका मोठ्या खोक्यात ठेऊन त्यावर मोठ्या अक्षरात  ‘मेडिकल किट’ असं लिहून घरात प्रत्येकाला दाखवून ठेऊन द्या. ते कधी नाही लागलं तर चांगलंच आहे, पण जेव्हा लागेल तेव्हा हे सगळं सामान एका जागी सापडेल आणि तुमचं कौतुक होईल हे नक्की!