तुम्हाला तुमच्या वस्तू जसं की खोडरबरं, शार्पनर आणि इतरही स्टेशनरी ठेवायला काही ना काही हवं असतं. उगाच त्यासाठी आईबाबांकडे हट्ट कशाला करायचा? आणि पैसे तरी खर्च का करायचे ना? त्यापेक्षा आता घरीच मस्त बाउल बनवा. साहित्य: मागच्या वर्षीच्या वाढदिवसाच्या वेळी शिल्लक राहिलेला फुगा, बीड्स, रंगीत कागद, दोरे किंवा असं कुठलंही टाकाऊ किंवा टिकाऊ साहित्य, फेविकॉल. कृती: 1) तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकाराचा बाउल बनवायचा आहे त्यानुसार फुगा फुगवून घ्या. 2) ज्या बाजूने तुम्ही गाठ मारलेली आहे ती बाजू वर ठेवा. 3) आता खालून बीड्स, टिकल्या, दोरा, कागद असं सगळं चिकटवायला लागा. 4) निम्मा फुगा या सगळ्या साहित्याने चिकटवून घ्या. 5) चिकटवताना त्यातल्या त्यात रंगसंगती होईल असं बघा.
फुगलेल्या फुग्याचा बाउल ! तो "असा"बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 07:50 IST
फुगलेल्या फुग्यापासून बनवायची एक भारी वस्तू
फुगलेल्या फुग्याचा बाउल ! तो असाबनवा
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग