तुमचं तुमच्या कोणत्या डोळयावर  जास्त  प्रेम  आहे ? - check  now 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 07:45 IST2020-04-30T07:45:00+5:302020-04-30T07:45:02+5:30

कुठला डोळा लाडका? तुमच्या कुठल्या डोळ्याचं तुम्ही जास्त ऐकता?

lockdown -DIY - check your eye preffrence- stay at home- kids activity | तुमचं तुमच्या कोणत्या डोळयावर  जास्त  प्रेम  आहे ? - check  now 

तुमचं तुमच्या कोणत्या डोळयावर  जास्त  प्रेम  आहे ? - check  now 

ठळक मुद्देआज पाहा शोधून! घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

- मराठी विज्ञान परिषद

तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्त प्रेम आहे. असे म्हंटले तर तुम्ही आम्हाला वेड्यात काढाल.
आमचा स्क्रू ढिला झाला आहे का अशी शंका तुम्हाला येईल. 
पण आम्हाला खात्री आहे. तुमचे तुमच्या एका डोळ्यावर जास्ती प्रेम आहे. 
त्याचेच तुम्ही ऐकता, दुस?्याचे अज्जिबात ऐकत नाही. चला सिद्ध करू या !
हे कसं सिध्द करणार?
1. घरा बाहेर बघा. 
2.मूठ बंद करून उजवा हात लांब करा. 
3.मुठीतले पहिले बोट मुठीबाहेर काढा. 
4. दूरवर दिसणारे झाड किंवा कोणतीही स्थिर वस्तू त्या बोटाने दाखवा. बोट हालवू नका. 
5. एकदा उजवा डोळा बंद करा एकदा डावा डोळा बंद करा. 
6. कोणता डोळा बंद केला की बोट हललले दिसते? 
7 - तो तुमचा लाडका डोळा. त्याचे तुम्ही मानता मानत नाही.

किती जणांचा उजवा डोळा लाडका आहे? किती जणांचा डावा डोळा लाडका आहे? 
माणसामध्येच एक डोळा लाडका असण्याचा फायदा कोणता आहे? तोटा कोणता आह?
करून पाहा बरं विचार!

 

Web Title: lockdown -DIY - check your eye preffrence- stay at home- kids activity