शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 7:40 AM

लांबटांग्या..

ठळक मुद्देकसा कराल हा व्यायाम?

प्राण्यांचे व्यायाम करायला, कश्शी भारी मजा येतेय की नाही? म्हणूनच गेले काही दिवस झाले, मी तुम्हाला प्राण्यांचे व्यायाम शिकवते आहे.आज आपण शिकणार आहोत, जिराफाचा व्यायाम. जिराफ खूप उंच असतो. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या चतुष्पाद प्राण्यांतला तो सर्वात उंच प्राणी तर आहेच, पण सर्वात मोठा रवंथ करणारा प्राणीही आहे. जिराफाचे बारकुडे वाटणारे पाय आणि मान यामुळे तो लुकडा-सुकडा वाटतो, पण जिराफाचं वजन किती असतं, तुम्हाला माहीत आहे? या लुकडय़ा-काटकुळ्या वाटणा:या जिराफाचं वजन तब्बल 1200 किलोर्पयत असतं. आणि आपल्या या काटकुळ्या पायांनी एवढं वजन तो सहजपणो पेलतो.तुम्हाला वाटत असेल, मग तोही हत्तीप्रमाणो हळूहळू पळत असेल. पण तीन हजार किलोचा हत्तीही वेळ आली की वेगात पळू शकतो आणि जिराफ तर ताशी तब्बल 56 किलोमीटर वेगानं पळू शकतो. हा शाकाहारी लंबूटांग दिवसभरात केवळ दोन-अडीच तासच झोपतो आणि तेही उभ्या उभ्या.जिराफ कायम मानेचा व्यायाम करत असतो आणि त्याची मान हेच जणू त्याचे हात असतात. हा लांबटांग्या आणि हाडूक उच्च व्यायाम कसा करायचा ते आपण आज पाहू. कसा कराल हा व्यायाम?

1- आधी निट सरळ उभे राहा.2- दोन्ही हातांची गुंफण करा.3- हात डोक्यावर न्या.4- नागीण डान्स करताना हात आपण जसे मागे पुढे करतो, तसे करत चाला.5- सोबत मानही मागे-पुढे करा.यामुळे काय होईल?1- हातांतली ताकद वाढेल.2- खांदे भरभक्कम होतील.3- मानेचा व्यायाम होईल.4- मानेचे स्नायू बळकट होतील.5- मानेचं दुखणं असल्यास ते कमी होऊ शकेल. (पण जास्त दुखायला लागलं तर मान मागे-पुढे करू नका.)6- खांद्यातल्या सांध्यांची लवचिकता वाढेल. 7- पाठीचाही व्यायाम होईल.असा हा जिराफ. त्याचे पायाचे व्यायामही फार भारी आहेत. तो चालताना आधी त्याचे दोन्ही पाय उचलून पुढे टाकतो आणि नंतर मागचे दोन्ही. तो व्यायाम कसा करायचा, ते मात्र तुमचं तुम्ही शोधून काढा.- तुमचीच ‘लांबटांगी’, ऊर्जा