हत्तीच्या सोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:55 PM2020-05-29T16:55:42+5:302020-05-29T16:56:05+5:30

हाथी की चाल.

elephent hand exercise | हत्तीच्या सोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम

हत्तीच्या सोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम

googlenewsNext
ठळक मुद्देकसा कराल हा व्यायाम?

हत्ती आपल्यापैकी प्रत्येकानेच पाहिला आहे. हत्ती हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. काही लोद्या आणि फोफशा लोकांना ब:याचदा ‘हत्ती’ म्हणून चिडवलं जातं, पण हत्तींचा तो खरोखरच अपमान आहे. 
कारण एकतर हत्ती नुसते बशे आणि टाइमपास करून वजन वाढवणारे प्राणी नाहीत. त्यांच्यात खरोखरच प्रचंड ताकद असते. आशियाई हत्तींचं वजन जवळपास तीन हजार किलो असतं, पण एवढं प्रचंड वजन घेऊन फिरत असतानाही ते बिलकुल सुस्त नसतात. ते विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण कोणी त्यांना आडवा आला, तर मात्र त्याला ते सोडत नाहीत. म्हणूनच वाघ, सिंह यांच्यासारखे प्राणीही हत्तीवर हल्ला करताना घाबरतात. कारण एकदा जर का कोणताही प्राणी त्यांच्या सोंडेत आला, तर त्याला ते थेट आसमान दाखवतात. म्हणजे सोंडेनं उचलून आकाशात भिरकावतात आणि खाली पडल्यावर आपल्या राक्षसी पायानं त्याचा चेंदामेंदा करतात. खेळ खल्लास!
हत्तीबद्दल आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे तो इतर सर्व जंगली प्राण्यांपेक्षा बुद्धिमान तर आहेच, पण जमिनीवर राहणारा तो सर्वात शक्तिमान आणि सर्वात मोठा प्राणी आहे. हत्तीपेक्षा फक्त काही देवमासे मोठे आहेत. सगळ्या प्राण्यांमध्ये जिराफानंतरचा तो सगळ्यात मोठा प्राणी आहे. 
हत्तीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याची सोंड. ही सोंड म्हणजे जणू त्याचे हातच असतात आणि त्यातही प्रचंड ताकद असते.
या हत्तीसोंडेचा, म्हणजेच त्याच्या हातांचा व्यायाम आज आपल्याला करायचा आहे. 
कसा कराल हा व्यायाम?
1- हत्तीसारखेच ठामपणो, पण आपल्या दोन पायांवर आधी उभे राहा.
2- दीड पायावर, म्हणजे एका पायावर वजन आणि दुसरा पाय, तिरका, थोडा लुळा सोडलेला असं करायचं नाही.
3- आता आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफवून त्याची सोंड करा.
4- कंबरेत वाका.
5- हत्ती जसा आपल्या प्रतिस्पध्र्यावर हल्ला करताना, आपली सोंड हवेत उंच करतो, त्याप्रमाणो आपल्या हातांची सोंड उंच करा आणि खाली करता.
6- हातांची ही सोंड खाली-वर करत राहा. 
7- हात शक्य तितके जमिनीजवळ जातील याचा प्रय} करा.
यामुळे काय होईल?
1- हातातली ताकद वाढेल.
2- खांदे बळकट होतील.
3- पाठीचे स्नायू ताकदवान होतील.
4- लवचिकता वाढेल.
 करून बघा आणि सांगा मला, हत्तीची ही चाल कशी वाटली तुम्हाला ते.
- तुमचीच ‘हाथी तुम्हारी साथी’ ऊर्जा

Web Title: elephent hand exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.