coronavirus : इटुकल्या ३ बहिणी कोरोना वॉरियर बनतात तेव्हा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:04 PM2020-04-09T23:04:43+5:302020-04-09T23:08:43+5:30

सिल्व्ही, जुलिआ आणि वायपर अमेरिकेतल्या या तीन बहिणींनी डॉक्टरांसाठी तयार केले आहेत कुकीज बॉक्स

coronavirus: When 3 sisters become Corona Warrior- girl-scouts-set-digital-cookie-booth-donate-boxes | coronavirus : इटुकल्या ३ बहिणी कोरोना वॉरियर बनतात तेव्हा.. 

coronavirus : इटुकल्या ३ बहिणी कोरोना वॉरियर बनतात तेव्हा.. 

Next
ठळक मुद्देछोट्या मुलींनी केलेली ही मोठी गोष्ट बघून आरोग्यसेवकांनाही खूप आनंद झाला. 

मेरिकेतील व्हजिर्निआ बीच परिसरात राहणा:या सिल्व्ही, जुलिआ आणि वायपर या तिघी बहिणी. कोरोनाच्या संकटात  पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस मात्र अखंड काम करत आहेत, आपलं कुटुंब विसरून लोकांना वाचवण्यासाठी झटत आहेत. त्यांचे थकलेले चेहेरे, टी.व्ही, फेसबुकच्या माध्यमातून या तिघीही बहिणींना दिसायचे. आपणही त्यांना चांगलं वाटावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं या तिघींना मनापासून वाटलं. आणि त्यांना ‘ऑनलाइन गल्र्स स्काउट कुकीज बुथ’ची कल्पना सूचली.  आणि नुसती कल्पना सूचली नाही तर असा बुथ त्यांनी सुरू देखील केला. या तिघी बहिणींमध्ये सिल्व्ही सर्वात मोठी. 
तिनं आपल्या दोन लहान बहिणींचं शुटिंग केलं. त्या दोघींनी हा कुकीज बुथ काय आहे, त्याचं काम कसं चालणार आहे, मदत कुठे आणि कोणती पाठवायची हे सर्व सांगितलं. हा व्हिडीओ मग सिल्व्हीनं फेसबुकवर टाकला. बघता बघता तो व्हायरल झाला. अनेकांना या बहिणींची कल्पना खूप आवडली.  

खूप जणांनी या बहिणींच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुकीज बॉक्स पाठवायला सुरूवात केली.  असे शेकडो बॉक्स  जमा झालेत. मग या मुलीनी हे सर्व बिस्कीटांचे बॉक्स नजीकच्या आरोग्यकेंद्राला दिले. तिथून ते मग कोरोना व्हायरसमुळे आाजारी असलेल्या रूग्णांसाठी अहोरात्र झटणा:या आरोग्य सेवकांर्पयत पोहोचले. छोट्या मुलींनी केलेली ही मोठी गोष्ट बघून आरोग्यसेवकांनाही खूप आनंद झाला. 

Web Title: coronavirus: When 3 sisters become Corona Warrior- girl-scouts-set-digital-cookie-booth-donate-boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.