शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

coronavirus:काही माणसं कोरोनाशी फाईट करतात, बरी होतात ती कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 07:00 IST

बातम्यांमध्ये सांगतात की कोरोनाचे पेशंट बरे होऊन आपल्या घरी परतले हे कसं काय?

ठळक मुद्देआपल्याकडे कोरोनाचं औषध आहे का?

मी पेपरमध्ये वाचले की कोरोनासाठी कोणतीही लस तयार झालेली नाही. त्यावर अजून कुठलंच औषध नाही. परंतु बातम्यांमध्ये सांगतात की कोरोनाचे पेशंट बरे होऊन आपल्या घरी परतले हे कसं काय? म्हणजे आपल्याकडे कोरोनाचं औषध आहे का?-आयुषी तेलतुंबडे, चंद्रपूर 

सर्दी, कोरडा खोकला, ताप आणि न्यूमोनियाची लक्षणो असतील तर त्या व्यक्तीने तातडीने तपासणी करून घेण्याची आवश्यकता असते.  कोरोना संशयित रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो त्याला त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. कोरोना हा विषाणू माणसाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला चढवतो. ज्या व्यक्तींची तब्येत उत्तम असते, ज्यांना आधीचे कुठले आजार नसतात, अशा बहुतेक व्यक्तींची प्रतिकार शक्ती उत्तम असते. त्यामुळे अशा व्यक्तीचं शरीर कोरोनाच्या विषाणूला जोरदार प्रतिकार करतं आणि आधीच माहित असलेल्या काही औषधांच्या मदतीने या विषाणूचा हल्ला परतवून लावतं. असे लोक कोरोनाशी फाईट करून बरे होतात.- पण सगळ्यांचंच शरीर ही फाईट करू शकत नाही.

अशा व्यक्तींमध्ये हा संसर्ग बळावतो आणि श्वास घ्यायला त्रस होऊन शेवटी त्यांचा मृत्यू ओढवतो. आयुषी हे बघ, सध्यातरी कोरोनावर औषध नाही, पण लक्षणांवर उपचार करून जगभरात 14 लाख रुग्णांपैकी 3 लाख लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. म्हणजे कोरोना बरा होतो त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. फक्त हा आजार पसरू नये यासाठी आपण सगळ्यांनीच योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. सरकरने ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाळायला सांगितलेल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. फक्त जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच घराबाहेर पडायचं. सतत साबणाने हात धुवायचे. एकमेकांचे मास्क वापरायचे नाहीत. सोशल डिस्टंसिंग पाळायचं. या गोष्टी आपण केल्या की कोरोना नक्की पळून जाईल.