शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: येथे अजिबात जाऊ नका, आहे इतकं थंड ठिकाण की गरम पाण्याचा क्षणार्धात होतो बर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 18:36 IST

जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दिवस थंडीचे आहेत. प्रत्येकजण ऊबदार जागेत राहण्यासाठी अंगावर पुरेशी ऊबदार वस्त्रे घालून या थंडीपासून आपलं रक्षण करत आहे. अर्थात आता फेब्रुवारीचा अर्धा महिना सरला आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात उन्हाळा सुरू होईल. आपल्याकडे उत्तर भारताचा काही भाग वगळता तापमान शुन्याच्या खाली जात नाही. सर्वसाधारण तर खूप थंडी असेल तर ८-७ अंश सेल्सिअस अशाच तापमानात आपण राहतो. मात्र तरीही आपल्याला या थंडीचा त्रास होतो. मग विचार करा शून्य किंवा त्याखाली तापमान असलेले लोक कसे राहत असतील? उत्तर भारतात तापमान शुन्याच्या खाली जाते. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय, की ओयमियाकन हे जगातलं सर्वात थंड प्रदेशांपैकी आहे. याठिकाणची माणसं रोजच या निसर्गाशी लढत असतात. इथे पाण्याचा बर्फ काही क्षणात होतो. थंडीच्या दिवसांत इथलं तापमान उणे ५० अंशाच्या आसपास असतं. खाद्यपदार्थ घराबाहेर नेल्यास त्वरीत ते घट्ट होतात. असं हे रशियातलं ओयमियाकन एक अतिथंड प्रदेशांपैकी एक असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

यूट्यूबवर हा व्हिडिओ अमन के फॅक्ट्स (Aman k Facts) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला अपलोड या व्हिडिओला 19 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. २६ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तिथलं जीवन सांगितलं आहे. ‘ये जगह मत जाना’ असं व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडिओ यूझर्सना प्रचंड आवडलाय. सध्या व्हायरलही झालाय.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबrussiaरशिया