हिवाळ्याला सुरूवात होताच अनेकजण फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. पण नेमकं कुठे जायचं? फिरायला किती खर्च येणार? कमी बजेटमध्ये सगळं झालं पाहिजे, हे सगळं बघावं लागतं. तुम्हीही असाच फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला कमी बजेटमध्ये फिरायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी तीन ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत. या तीनपैकी एका ठिकाणावर फिरण्यासाठी तुम्हाला केवळ ५ हजार रूपये खर्च करावे लागतील.
मंदारमणि
हे ते ठिकाण आहे, जिथे गंगा नदी बंगालच्या खाडीत जाऊन सामावते. पवित्र आणि प्राचीन मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा सगळा स्ट्रेस विसरून जाल. हा एक आकर्षक बीच असून इथे जास्त गर्दी गेखील नसते. जर तुम्ही दिल्लीहून इथे गेलात तर ६०० रूपयात रेल्वने कोलकाताला पोहोचू शकता. कोलकाताहून तुम्ही मंदारमणिला पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला केवळ १४० रूपये लागतील. तसेच मंदारमणिमध्ये हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. इथे एका व्यक्तीच्या राहण्यासाठी ६०० रूपये भाडं लागेल. इथे फिरण्याचा सर्वात चांगला कालावधी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान असतो.
मुक्तेश्वर
तुम्हाला जर अॅडव्हेंचरची आवड असेल तर तुम्ही ऑफबीट डेस्टिनेशन असलेल्या मुक्तेश्वरला भेट देऊ शकता. रॉक-क्लायम्बिंग, कॅम्पिंग, पॅराग्लायडिंग आणि अशा अनेक गोष्टी तुम्ही इथे करू शकता. इथे पोहोचण्याचा सर्वात चांगला आणि स्वस्त मार्ग दिल्ली ते काठगोदामपर्यंत रेल्वे आणि पुढे मुक्तेश्वरसाठी बस.
रेल्वे आणि बससाठी तुम्हा एकूण ७०० ते १५०० रूपये खर्च येईल. तर इथे राहण्यासाठी एका व्यक्तीचं एका रात्रीचं भाडं ५०० रूपये असेल. इथे राहण्यासाठी हॉस्टेलही आहेत. इथे फिरायला जाण्याचा सर्वात चांगला कालावधी हा ऑक्टोबर ते डिसेंबर मानला जातो.
दमण आणि दीव
गुजरातमधील लोकांना वीकेंडसाठी सर्वात बेस्ट ठिकाण दमण आणि दीव मानलं जातं. सुंदर बीच आणि सुंदर नजारे एका चांगल्या ट्रिपसाठी अजून काय हवंय? मुंबईतून जाणार असाल तर तुम्ही रेल्वेने फार कमी खर्चात इथे पोहोचू शकता. इथे फिरायला जाण्याचा सर्वात चांगला कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा मानला जातो.