शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

अख्खी मुंबई फिरलो म्हणणाऱ्यांनो! मुंबईतील ही ठिकाण तुम्हाला ठाऊकच नसतील, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 19:10 IST

ही ठिकाणं पाहिल्यानंतर तुमचा गोड गैरसमज दूर होईल. एकतर मी मुंबईत राहून मला याबाबत माहिती कसं नाही? याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. किंवा मी पूर्ण मुंबई अजून फिरलोच नाही, असंच तुम्ही म्हणाल. tripoto.com वर या सुंदर ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.

मी मुंबईत राहतो, मला मुंबईतील सर्व माहिती आहे, मी अख्खी मुंबई फिरलो आहे, असा दावा तुम्ही करत असाल. तर थोडं थांबा. ही ठिकाणं पाहिल्यानंतर तुमचा गोड गैरसमज दूर होईल. एकतर मी मुंबईत राहून मला याबाबत माहिती कसं नाही? याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल. किंवा मी पूर्ण मुंबई अजून फिरलोच नाही, असंच तुम्ही म्हणाल. tripoto.com वर या सुंदर ठिकाणांची माहिती देण्यात आली आहे.

क्वान कुंग मंदिरमाझगावमधील एका छोट्याशा गल्लीतील दुमजली घरात असलेले क्वान कुंग मंदिर मुंबईच्या मध्यभागी असलेल्या चिनी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवते! हे मंदिर 1919 मध्ये बांधलेले हे शहरातील एकमेव चिनी मंदिर आहे. येथे तुम्ही नक्की भेट देऊ द्यायला हवी.

पांडवकडा धबधबामुंबईतच एक धबधबा आहे हे तुम्हाला माहिती आहे का. हे सुंदर ठिकाण नवी मुंबईच्या उपनगरातील खारघरमधील हिरव्या पांडवकडा टेकड्यांमध्ये आहे. या 107 मीटर उंच धबधब्याचे नाव 'पांडवां'शी संबंधित असलेल्या पुराणकथेवरून पडले आहे. पावसाळ्यात तुम्ही येथे भेट देऊ शकता.

ओव्हल मैदान आर्ट डेकोशिवशक्ती भवन हे मुंबईतील ओव्हल मैदानाच्या अप्रतिम 18 आर्ट डेको वास्तूंपैकी एक आहे. या परिसराने अनोख्या वास्तुशिल्प वारशासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा मान मिळवला आहे. ओव्हल मैदान हे दोन अभूतपूर्व वास्तुशिल्पीय टाइम झोनमध्ये उभे आहे. येथे एका बाजूला आर्ट डेको झुंबर आणि दुसऱ्या बाजूला भव्य व्हिक्टोरियन इमारतींचा समूह आहे.

माउंट मेरी स्टेप्समाउंट मेरी स्टेप्स हे अतिशय सुंदर ठिकाण मुंबईत वांद्रे पश्चिमेला माउंट मेरी चर्चच्या शेजारी आहेत! आय लव्ह मुंबई फाऊंडेशनचे संस्थापक राहुल एन कनल यांच्यासह कलाकार टायरेल वलादारेस यांनी या कला प्रकल्पाचा एक भाग म्हणून या स्टेप्स बनवल्या आहेत.

राजभवनमलबार हिलमधील 50 एकर राजभवनाला तुम्ही सहज भेट देऊ शकता. तुम्ही या ठिकाणी सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान मार्गदर्शित टूरसह अवघ्या 25 रुपयात भेट देऊ शकता. येथील सुंदर सूर्योदय अनुभवणे हा खूप विस्मरणीय अनुभव असेल. येथील संग्रहालयाला देखील तुम्ही भेट देऊ शकता.

सीएसएमटी हेरिटेज म्युझियमछत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक तर सुंदर कलाकृती आहेच, परंतु येथे पाहण्यासाठी आणखी बरेच काही आहे. येथील रेल्वे हेरिटेज संग्रहालयाला तुम्ही भेट देऊ शखता. युनेस्कोने सूचीबद्ध केलेल्या या वास्तुशिल्पाच्या सौंदर्याचा अनुभव तुम्ही 200 रुपयांच्या शुल्कासह घेऊ शकता.

मोगल मशीदहे सुंदर पर्शियन ठिकाण इराणमध्ये नाही तर डोंगरीच्या बायलॅनमध्ये आहे. ही 155 वर्षे जुनी मशीद गजबजलेल्या मोहम्मद अली रोडच्या मध्यभागी आहे. येथे तुम्हाला निसर्ग आणि माशांनी भरलेला तलाव देखील पाहू शकता. आकर्षक निळ्या टाइल्सच्या मोझॅकने बनवलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताना शहराच्या गर्दीतून सुटका झाल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो.

एस्सेल वर्ल्ड बर्ड पार्कएस्सेल वर्ल्ड हे भारतातील पहिले इंटरएक्टिव्ह बर्ड पार्कचे घर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुमही या रम्य ठिकाणी सुंदर पक्षांच्या सानिध्यात काही तास घालवू शकता. तुमच्या मुलांसोबत रु.390 मध्ये या ठिकाणी आनंदी वेळ घालवू शकता.

कोस्टल आणि मरिना जैवविविधता केंद्रतुम्ही मुंबईत फ्लेमिंगो पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ऐरोलीमधील किनारपट्टी आणि सागरी जैवविविधता केंद्र हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. 2017 मध्ये उघडलेले हे केंद्र पर्यावरण पर्यटन आणि जैवविविधता संवर्धनाला प्रोत्साहन देते. हे ठिकाण अनुभवासाठी आणि पक्षी पाहण्यासाठी खाडीभोवती बोटी देखील आहेत.

आशिया आणि युरोपमधील 70,000 प्रदर्शनांसह छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे एक कला, इतिहास आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालय आहे. तुम्हाला संग्रहालये पाहण्याची आवड असल्यास हे ठिकाण त्याच्या पुरातत्व संग्रह आणि नैसर्गिक इतिहास विभागासह परिपूर्ण असेल. सर जॉर्ज विटेट यांनी इंडो-सारासेनिक स्थापत्य शैलीत डिझाइन केलेले, एका सुसज्ज बागेच्या विरूद्ध उभारलेले, संग्रहालय शहराची एक महत्त्वाची हेरिटेज इमारत आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स