विमानाने प्रवास करायचा असेल तर आपण नेहमीच आरामदायी कपड्यांना प्राधान्य देतो. थोडे ढीले कपडे, जॅकेट आणि मोजे हे तर प्रवासाचा अविभाज्य भागच आहेत. मात्र, तुम्ही वापरत असलेल्या मोज्यांचा साधा रंगदेखील तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे? विशेषतः विमानात काळे मोजे घालणे, हे मोठे त्रासदायकही ठरू शकते.
म्हणून टाळावेत काळे मोजे -खरेतर अनेकजण काळे मोजे निवडतात, कारण ते लवकर खराब होत नाहीत. मात्र, रात्रीच्या वेळी किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात विमानाच्या केबिनमधील लाइट्स मंद केले जातात. अशा वेळी काहीशा अधारात काळा रंग सहजासहजी दिसत नाही. जर एखाद्या प्रवाशाने आपले पाय पसरले असतील किंवा चालण्याच्या वाटेत (Aisle) पाय आला असेल, तर अंधारामुळे ते लक्षात येत नाहीत. यामुळे, विमानात काम करणारे क्रू मेंबर्स किंवा इतर कुणी प्रवासी तुमच्या पायाला धडक होऊन पडण्याची शक्यता असते. याशिवाय, जड सर्व्हिस ट्रॉली पायाला लागली, तर आपल्याला गंभीर दुखापत होऊ शकते.
स्वच्छता आणि सुरक्षित पर्याय -विमानातील पृष्ठ भागावर विविध प्रकारचे बॅक्टेरिया असू शकतात. यामुळे मोजे घालणे गरजेचे आहेच, पण ते स्पष्ट दिसणारे असावेत. तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या किंवा राखाडी अशा फिकट रंगाचे मोजे वापरणे अधिक सुरक्षित ठरते. हे रंग कमी प्रकाशातही स्पष्ट दिसतात. यामुळे धडक बसण्याची शक्यताही कमी होते. यामुळे आपला एक छोटासा निर्णय आपला विमान प्रवासही अधिक सुखकर आणि सुरक्षित करू शकतो.
Web Summary : Wearing black socks on flights poses risks. Low light makes them hard to see, increasing trip hazards for crew and passengers. Choose light-colored socks for safer travel.
Web Summary : फ्लाइट में काले मोज़े पहनना जोखिम भरा हो सकता है। कम रोशनी में वे दिखाई नहीं देते, जिससे क्रू और यात्रियों के लिए ठोकर लगने का खतरा बढ़ जाता है। सुरक्षित यात्रा के लिए हल्के रंग के मोज़े चुनें।