शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Travel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 19:03 IST

एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीचा तर महिलांना जास्त त्रास होतो. मात्र, आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे.

एकट्याने प्रवास करायचा म्हटलं की, महिलांच्या भारी जीवावर येतं. खरंय ना? कारण तुमचाही अनुभव काही वेगळा नसणारच. एकट्याने प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते. याच गोष्टीचा तर महिलांना जास्त त्रास होतो. मात्र, आता आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास अगदी सोप्पा होऊन जाणार आहे. माहिती आहेत काय आहेत या टिप्स? तर जाणून घ्या आणि अनुभवा जग तुमच्या स्वत:च्या जिज्ञासेने...१. तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर तुमचे राहण्याचे ठिकाण आधीपासून योग्य पद्धतीने बुक करुन ठेवा. या हॉटेलचे फोटो आणि इतर गोष्टींची पूर्णपणे माहिती करुन घ्या. होम स्टे असेल तर त्यांच्याशीही आधीपासून संपर्कात राहा.२. प्रवासादरम्यान लोकांना भेटा, त्यांच्याशी ओळखीही करा पण तुमच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी अनोळखी लोकांना सांगणे टाळाच.३. तुमच्या प्रवासाशी निगडीत असणारी कागदपत्रे योग्य पद्धतीने, सुरक्षित ठिकाणी ठेवा. पासपोर्ट, तिकिटे यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो तुमच्या फोनमध्ये आणि मेलवर सेव्ह करा. जेणेकरुन तुमची बॅग हरवलीच तर तुमच्याकडे प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे असतील.४. ज्याठिकाणी कामासाठी किंवा फिरण्यासाठी जाल त्याठिकाणी तुम्ही एकट्या आल्या आहात असे समोरच्याला समजणार नाही असे वागा. यासाठी वेगळ्या पद्धतीने आत्मविश्वासाने वागण्याची आवश्यकता आहे. हा आत्मविश्वास बाळगा.५. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती साधने तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्प्रे, सेफ्टी अलार्म, एखादा लहान चाकू सोबत ठेवा. काही अडचण आल्यास तात्काळ वापरण्यासाठी याचा उपयोग होतो.६. तुम्ही प्रवासासाठी नेलेले पैसे एकाच ठिकाणी ठेऊ नका. ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवा. तसेच सामान्य जागांपेक्षा वेगळ्या जागांवर पैसे ठेवा. याशिवाय आवश्यक असतील तेवढीच रोख रक्कम सोबत ठेवा.७. ज्याठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणाला शोभेल असेच कपडे घाला. जेणेकरुन तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाणार नाही.८. तुम्ही ज्याठिकाणी जात आहात त्याठिकाणची जास्तीत जास्त माहिती करुन घेण्याचा प्रयत्न करा. भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीविषयी शक्य तितके जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल.