शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

​Travel : पावसाळ्यात सेलिब्रेटींची या ‘4’ ठिकाणांना अधिक पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 14:35 IST

सेलिब्रेटी या काळात पावसाचा आनंद घेण्यासाठी काही ठराविक ठिकाणांना पसंती देतात. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...

-Ravindra Moreआपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून प्रत्येक सेलिब्रेटी त्यांच्या आवडीच्या ठिकाणांना भेट देत असतात. विशेषत: प्रत्येक ऋुतूमानानुसार त्यांचे ठिकाण ठरलेले असते. नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली असून या दिवसात फिरण्याची मजा काही औरच असते. सेलिब्रेटी या काळात पावसाचा आनंद घेण्यासाठी काही ठराविक ठिकाणांना पसंती देतात. जाणून घेऊया त्या ठिकाणांबाबत...* लोणावळापावसाळ्यात लोणावळा परिसरातील डोंगर आणि दऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी सेलिब्रेटींची अधिक पसंती असते. या ठिकाणाला भारताचे स्वित्झरलॅँडदेखील म्हटले जाते. पावसाळ्यादरम्यान या ठिकाणी निसर्ग खूपच जवळून पाहण्याचा आनंद मिळतो. येथे एक प्राचीन बौद्ध मंदीर आहे. विशेष म्हणजे दगड कापून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.   * दूधसागर मान्सूनमध्ये लोक गोवाला आॅफ सिजन बोलतात. मात्र आपण मान्सूनमध्येच गोवाचा आनंद घेण्यासाठी जावे. सेलिबे्रटीदेखील याठिकाणी पावसाळ्यात पावसाचा आनंद आणि थंडगार हवेचा आनंद घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे गोवा आणि कर्नाटक सिमेवर दूधसागर धबधबा पावसाळ्यास ओसंडून वाहत असतो. दूधसागर धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य या दिवसात अधिकच खुलून दिसते. हा तोच धबधबा आहे जो ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटात दाखविण्यात आला आहे. घनदाट जंगलामध्ये विस्तारलेला दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जून पासून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान खूपच गर्दी असते. हा धबधबा लांब अंतराने पाहिल्यास डोंगरावरुन दुधाचा सागर वाहत असल्याचे दिसते. * आग्रापावसाळ्यात रोमॅँटिक सेलिब्रेटी कपल्स विशेषत: आग्राला भेट देतात. प्रेमाचे प्रतिक आणि जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहल याठिकाणी हे रोमॅँटिक कपल्स आपल्यातील प्रेम भावना प्रकट करण्यासाठी जातातच. ताजमहलाशिवाय याठिकाणी बरेच किल्ले आणि राजवाडे आहेत. विदेशी पर्यटकदेखील याठिकाणी मोठ्याप्रमाणात भेट देतात. * उदयपुर ज्या सेलिब्रेटींना डोंगर दऱ्यांमध्ये फिरायला आवडत नाही ते राजस्थानमधील उदयपुरला आवर्जून भेट देतात. पावसाळ्यात उदयपुराचे सौंदर्य अधिकच खुलते. विशेषत: या दिवसात रंगीत राजस्थानच्या सौंदर्याची झलक पाहावयास मिळते. येथील संस्कृती आणि राजवाडे पाहून आपला सर्व थकवा दूर होतो. Also Read : ​​मुंबईकरांनी पावसाळ्यात ‘या’ गोष्टींचा अनुभव अवश्य घ्यावाच !