शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

IRCTC Tour Package : महाकालच्या दर्शनासाठी IRCTC चे स्पेशल टूर पॅकेज, इतका येईल खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:14 IST

IRCTC Tour Package : तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता. 

नवी दिल्ली : भाविकांसाठी एक चांगली बातमी आहे. भगवान महादेवाच्या 5 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या भारतीय रेल्वेच्या उपक्रमाद्वारे एक विशेष ट्रेन चालवली जाईल. त्यामुळे भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहेत. तुम्हालाही महादेवाच्या दर्शनासाठी जायचे असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही यात्रेला जाऊ शकता. 

कधी होईल यात्रा?आयआरसीटीनुसार, 9 दिवसांचा प्रवास 4 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. गुलाबी शहर जयपूर येथून प्रवास सुरू होईल. या प्रवासादरम्यान भाविकांना 5 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच तुम्ही एलोरा लेण्यांना भेट देऊ शकता.

कुठे-कुठे जाईल ट्रेन?स्पेशल ट्रेन त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. हे ज्योतिर्लिंग अनुक्रमे वेरावल, नाशिक, द्वारका, पुणे आणि औरंगाबाद शहरात स्थित आहे. याशिवाय, भाविक द्वारकाधिश मंदिरमध्ये भगवान श्रीकृष्णाचे सुद्धा दर्शन घेऊ शकतील. 

काय मिळेल सुविधा?यात्रा दोन कॅटगरीत विभागली आहे. पहिली कॅटगरी सँडर्ड आहे. या कॅटगरीचे भाडे 21390 आहे. तर, दुसरी कॅटगरी सुपीरियर आहे.  या कॅटगरीचे भाडे 24230 ठेवण्यात आले आहे. मात्र, दोन्ही कॅटगरीतील भाविकांसाठी बससेवा नॉन-एसी आहे. याबाबत अधिक माहिती देताना आयआरसीटीसीचे जॉइंट जनरल मॅनेजर म्हणाले की, यावेळी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ही यात्रा करण्यात येत आहे.

ही ट्रेन जयपूरपासून रवाना होईल. यानंतर अजमेर, भीलवाडा आणि उदयपूरहून नाशिकला पोहोचेल. याठिकाणी भाविक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करतील. दरम्यान, भाविक आयआरसीटीसीच्या वेबसाइट भेट देऊन तिकीट बुकिंग करू शकतात. याशिवाय, रेल्वेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अधिक माहिती मिळवू शकतात.    

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJyotirlingaज्योतिर्लिंग