(Image Credit : Travelogy India)
ऑक्टोबर सुरू होताच गुलाबी थंडी हळूहळू सुरू होत असल्याचं जाणवत आहे. या वातावरणात फिरण्याची गंमत औरच असते. अशातच जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी फिरायला जाण्याचा आनंद नक्की घ्या. जाणून घेऊया कोणती ठिकाणं आहेत. जी हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठरतात.
वायनाड, केरळ
केरळमधील उत्तर पूर्व भागामध्ये असलेलं वायनाड शहर आपल्या अद्भूत निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. या ठिकाणाची खासियत म्हणजे, येथे असणारं जंगल जवळपास 3000 वर्षांपूर्वीचं आहे. पावसाळ्यानंतर या ठिकाणचं सौंदर्य आणखी बहरतं. जर तुम्हाला शांत ठिकाणी फिरण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी फिरण्याचा आनंद नक्की घ्या.
नैनीताल, उत्तराखंड
पावसाळ्यानंतर डोंगर-दऱ्यांमध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. नैनिताल भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. पावसाळ्यानंतर जर तुम्हाला डोंगर दऱ्यांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नैनितालमध्ये फिरण्यासाठी नक्की जा. हिवाळ्यात येथे फिरण्याची एक वेगळीच गंमत आहे. कारण पावसाळ्यात नैनितालमध्ये खूप पाणी असतं आणि येथील निसर्गसौंदर्य न्याहाळणं म्हणजे स्वर्ग सुखचं. हिरवेगार डोंगर, ओल्ड कॉटेज आणि येथील बाजार ज्यांमध्ये लाकडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू फार सुंदर दिसतात.
बांधवगढ नॅशनल पार्क, मध्य प्रदेश जर तुम्हाला वन्य प्राणी पाहायला आवडत असतील तर हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम ठरेल. येथे जंगलामधील वाघ, हत्ती यांसारखे वन्य प्राणी पाहण्याचा अनुभव घेता येइल. येथे फिरण्यासाठी हिवाळा अत्यंत उत्तम ठरतो. कारण या दिवसांमध्ये जंगलामध्ये प्राणी तुम्हाला फिराना दिसतील.
दार्जिलिंग, आसाम
डोंगरांमध्ये उंचावर चहाचे मळे पाहण्याची इच्छा असेल तर दार्जिलिंगला फिरण्यासाठी नक्की जा. ऑक्टोबरचा महिना येथे फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. येथे तुम्ही दार्जिलिंगच्या ट्रेनमध्ये फिरण्याचा अनुभव घेऊ शकता. तसेच येथील निसर्गसौंदर्य पाहून तुमचं मन प्रसन्न होईल.