शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:30 IST

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते.  

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी यातील लोकेशनची चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमधील भव्य मेहरानगढ या किल्ल्यात झालं. त्यामुळे या किल्ल्याबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे. चला जाणून घेऊ या किल्ल्याची खासियत..

या किल्ल्याच्या भींती १० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. यांची उंची २० फूट ते १२० फूट तर रुंदी १२ फूट ते ७० फूट इतकी आहे. या किल्ल्यातील रस्ते वळणादार असल्याने वेगळाच आनंद मिळतो. तसेच या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. या किल्ल्याच्या आत अनेक भव्य महाल असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. 

जोधपूरचे शासक राव जोधा यांनी १२ मे १४५९ मध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. आणि महाराज जसवंत सिंह यांनी १६३८ ते ७८ दरम्यान या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. म्हणजे या किल्ल्याचा इतिहास हा ५०० वर्ष जुना आहे. 

किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

१९६५ मध्ये भारत-पाक युद्धावेळी सर्वातआधी मेहरानगढाला टार्गेट केलं गेलं होतं. पण किल्ल्याचं काही नुकसान झालं नाही. या किल्ल्याच्या टोकावरून पाकिस्तानची सीमा बघायला मिळते. इथे अनेक लोक किल्ल्याच्या टोकावर जाऊन पाकिस्तानची सीमा बघण्यासाठी अधिक उत्सुक असतात. 

कसे पोहोचाल?

तुम्ही जर विमानाने जाणार असाल तर जोधपूर एअरपोर्ट तुमच्यासाठी सोपं पडेल. तर रेल्वे जाणार असाल तर जोधपूर रेल्वे स्टेशनवरून मुख्य शहारासाठी टॅक्सी किंवा बसेस सहज मिळतात. दिल्ली आणि आग्र्याहून जयपूरसाठी थेट बसेसही मिळतात. 

कधी जाल?

मेहरानगढ किल्ला बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वाच चांगला कालावधी मानला जातो. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनRajasthanराजस्थान