शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

रेल्वेने प्रवास करताना कमी सामानच घ्या, जास्त सामानाची वाहतूक पडेल चांगलीच महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:53 IST

रेल्वे अधिक सामान घेऊन जाण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे.

तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि जास्त सामान घेऊन जात असाल तर आता तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. वास्तविक, आता रेल्वे अधिक सामान घेऊन जाण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामध्ये लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रेल्वे प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन जाऊ नका. तसे असल्यास ते लगेज व्हॅनमध्ये नक्कीच बुक करा. सामान जास्त असेल तर प्रवासाची मजा अर्धवट राहील!

प्रत्येक प्रवाशासाठी निश्चित केली आहे मर्यादाभारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वे प्रवासी त्यांच्यासोबत रेल्वेच्या डब्यात ४० किलो ते ७० किलो वजनाचे सामान ठेवू शकतात. यापेक्षा जास्त सामान असल्यास प्रवाशांना वेगळे भाडे द्यावे लागेल. रेल्वेने प्रत्येक डब्यानुसार वजन निश्चित केले आहे. स्लीपर क्लासमध्ये प्रवासी ४० किलोपर्यंत सामान नेऊ शकता. AC-2 टियरमध्ये, ५० किलोपर्यंतचे सामान नेण्याची परवानगी आहे. तर फर्स्ट क्लास एसीमध्ये जास्तीत जास्त ७० किलो वजनाच्या सामान प्रवाशांना कोचमध्ये सोबत नेता येऊ शकते. निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वजनासाठी रेल्वे प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते.

आकारला जाईल मोठा दंडमाहितीनुसार, जर एखादा प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करताना आढळला, तर त्याला स्वतंत्रपणे सहापट बॅगेज रेट द्यावा लागेल. म्हणजेच, जर कोणी ४० किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन ५०० किमी प्रवास करत असेल, तर प्रवासी फक्त १०९ रुपये देऊन लगेज व्हॅनमध्ये बुक करू शकतात. दुसरीकडे, प्रवासादरम्यान प्रवासी अधिक सामानासह पकडले गेल्यास त्याला ६५४ रुपये दंड भरावा लागणार आहे.

प्रतिबंधित वस्तू बाळगण्यावर कारवाईरेल्वेने प्रवास करताना प्रतिबंधित वस्तू बाळगणे गुन्हा आहे. पॅसेंजर गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे किंवा ओली त्वचा, तेल, वंगण, पॅकेजमधील तूप, वस्तू ज्यांच्या तुटण्यामुळे किंवा टपकल्याने प्रवाशांना इजा होऊ शकते. त्यानंतरही प्रवाशांनी या प्रतिबंधित वस्तू घेऊन प्रवास केल्यास रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अन्वये प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वे