शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:45 IST

सध्या सगळीकडच्यांच रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर लक्षात येईल की, खूप मोठमोठे खड्डे या रस्त्यांवर आपल्याला दिसून येतात. या रस्त्यांवरून बाईक चालवणे हे काही सोपे काम नाही.

बाईक चालवण्याची क्रेझ जर तुम्हाला असेल तर मग तुम्ही जपूनच बाईक चालवायला हवी, असे अनेकदा कित्येकांनी तुम्हाला सांगितलेच असेल. मात्र, लोकांचे सांगणे आपण कुठे मनावर घेतो? आपण त्यांच्या सांगण्याला डावलून आपल्या मनाला जसे वाटेल तसेच तर करतो. सध्या सगळीकडच्यांच रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर लक्षात येईल की, खूप मोठमोठे खड्डे या रस्त्यांवर आपल्याला दिसून येतात. या रस्त्यांवरून बाईक चालवणे हे काही सोपे काम नाही. नियंत्रण ठेवून जर बाईक चालवली तर बाईक रायडिंगचा आनंद सुरक्षितपणे आपल्याला लुटता येऊ शकतो. पाहूयात कोणत्या गोष्टींची बाईक चालवताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी ते...१. बाईक चालवत असताना आपल्या चुकीमुळेच अपघात होईल असे नाही. तर इतरांच्या चुकीमुळेही आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जीवाशी खेळ तडजोड करु नका.२. बाईक चालवताना कायम हेल्मेट वापरा. साधे कोणतेही हेल्मेट वापरणे धोक्याचे ठरु शकते, त्यामुळे आपले हेल्मेट आयएसआय मार्क असलेले असेल याकडे लक्ष द्या. हेल्मेटचे मटेरीयल चांगले आहे ना हे तपासून पाहण्याबरोबरच ते आपल्या डोक्यात योग्य पद्धतीने बसते का नाही ते पाहा.३. बाईकच्या वेगाबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. बाईक चालवताना आपली नजर चुकणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. रस्ता आणि नियम यांच्यानुसारच बाईक चालवायला हवी.४. आपण चालवत असलेल्या बाईकच्या वेगाबाबत एक मर्यादा ठरलेली असते. त्यानुसार बाईक चालवायला हवी. आपल्या गाडीच्या मर्यादेपलिकडे जाणे टाळावे. गाडी शांतपणे चालवावी. विनाकारण वेगाने चालविणे टाळावे.५. आपण नियमित चालवत असलेल्या बाईकचे योग्य पद्धतीने सर्व्हीसिंग झाले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. गाडीचे ब्रेक, हॉर्न योग्य पद्धतीने चालत नसतील तरीही अनेक जण तशीच गाडी वापरत राहतात. मात्र हे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे गाडीचे वेळच्या वेळी सर्व्हीसिंग करणे आवश्यक आहे.६. गाडीला असणाऱ्या अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीममुळे अनेक अपघात टळल्याचे आपण पाहतो. गाडीमध्ये हे फिचर असल्यास ते नक्कीच फायद्याचे ठरते. हे फिचर केवळ महागड्या गाड्यांनाच असते असे नाही. तर अनेक सामान्य गाड्यांमध्येही सध्या हे फिचर देण्यात आले आहे.