(Image Credit : treebo.com)
फिरायची आवड असणारे लोक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये गोव्याला फिरायला जाणा असाल हे या सीझनमध्ये जाण्यासाठी परफेक्ट ठिकाण आहे. गोव्यातील अनेक ठिकाणांवर तुम्ही फिरला असलाच, पण गोव्यातील त्याच त्याच प्रसिद्ध ठिकाणांवरच लोक जातात. गोव्यात अशीही अनेक ठिकाणे आहेत जी बघण्यासारखी आहेत. या ठिकाणांबाबत कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल.
अगोंदा बीच
पणजीपासून जवळपास ७० किमी अंतरावर हा बीच आहे. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा आणि मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता इथे मिळते. या बीचबाबत फार कमी लोकांना माहिती असावी. इथेही तुम्ही सर्फिंग, कॅम्पिंग आणि स्कीइंग या गोष्टी करू शकता. अगोंडा बीचला जाण्यासाठी बस, कॅब उपलब्ध असतात.
बटरफ्लाय बीच
बटरफ्लाय बीचवर पोहोचणं तसं सोपं नाहीये, पण एकदा या बीचला आवर्जून भेट द्यावी असाच आहे. या बीचवर जाण्यासाठी तुम्हाला जंगलातून जावं लागेल. कारण इथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. या बीचवर जाण्यासाठी आधी तुम्हाला पॅलोलम बीचला जावं लागेल आणि तेथून बोटच्या माध्यमातून तुम्ही बटरफ्लाय बीचवर जाऊ शकता. जर अॅडव्हेंचरचे शौकीन असाल तर इथे नक्की भेऊ शकता. या बीचला सीक्रेट बीच नावानेही ओळखले जाते. या बीचला बटरफ्लाय नाव पडलं कारण इथे वेगवेगळ्या प्रजातींचे बटरफ्लाय आढळतात.
होल्लांत बीच
गोव्यातील या बीचबाबतही फार जास्त लोकांना माहिती नसेल. इथे पर्यटकांची फार जास्त गर्दी नसेल. त्यामुळे इथे तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. पणजीपासून हा बीच केवळ २७ किमी अंतरावर आहे.
बेतूल बीच
गोव्यात गेलात तर केवळ प्रसिद्ध-ऐकलेल्या बीचेसवरच जाऊ नका. काही असेही सीक्रेट किंवा लोकांना फार कमी माहीत असलेले बीचेस इथे आहेत. कारण या ठिकाणांवर तुम्ही निसर्गाचं सौंदर्य बघू शकता. बेतूल बीच पणजीपासून जवळपास ५० किमी अंतरावर आहे. इथे तुम्ही बसने जाऊ शकता. प्रायव्हेट टॅक्सीही उपलब्ध असतात. इथे स्वादिष्ट सीफूड खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
बेतालबाटीम बीच
पणजीपासून साधारण ३८ किमी अंतरावरील सूर्यास्त बघण्यासारखा असतो. या बीचला सनसेट बीच असंही म्हटलं जातं. दक्षिण गोव्याच्या या बीचेसवर लोकांची जास्त गर्दी नसते. अशात तुम्ही इथे फिरण्याचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता आणि चांगला वेळ घालवू शकता.