कुठल्याही देशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत, व्हिसादेखील आवश्यक असतो. मात्र, तुम्हाला युरोपातील देश फिरण्यासाठी वेगवेगळे व्हिसा घेण्याची गरज नाही. एकाच व्हिसातून तुम्ही अनेक देश फिरू शकता. यासाठी शेंगेन (Schengen) व्हिसा अत्यंत उपयुक्त ठरतो. या व्हिसाच्या माध्यमातून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन, ऑस्ट्रिया, ग्रीस यांसह युरोपमधील तब्बल 29 देशांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवेश करता येतो. विशेष म्हणजे, शेंगेन व्हिसा असल्यास युरोपबाहेरील काही देशांमध्येही व्हिसा-फ्री एंट्री मिळू शकते.
तज्ज्ञांच्या मते, शेंगेन व्हिसा देण्यापूर्वी अर्जदाराची अत्यंत काटेकोर तपासणी केली जाते. त्यामुळे हा व्हिसा मिळणे सोपे नसते. याच कारणामुळे अनेक देश शेंगेन व्हिसाधारकांवर विश्वास ठेवून त्यांना व्हिसा-फ्री किंवा सुलभ प्रवेश देतात.
शेंगेन व्हिसाद्वारे प्रवेश मिळणारे युरोपीय देश
शेंगेन व्हिसाच्या आधारे ऑस्ट्रिया, एस्टोनिया, नेदरलँड्स, स्लोव्हाकिया, बेल्जियम, फिनलंड, नॉर्वे, स्लोव्हेनिया, बुल्गारिया, फ्रान्स, पोलंड, स्पेन, क्रोएशिया, जर्मनी, पोर्तुगाल, स्वीडन, चेक प्रजासत्ताक, ग्रीस, रोमानिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, हंगेरी, लाटविया, आइसलँड, इटली, लिथुआनिया, लिक्टेनस्टाईन, लक्झेंबर्ग आणि माल्टा या देशांमध्ये मुक्त प्रवेश करता येतो.
युरोपबाहेरील व्हिसा-फ्री देश
याशिवाय, शेंगेन व्हिसाच्या आधारे बेलारूस, सायप्रस, दक्षिण कोरिया, मेक्सिको, कोलंबिया, किर्गिझस्तान, सर्बिया, ग्वाटेमाला, निकाराग्वा, व्हॅटिकन सिटी, अल्बानिया, जॉर्जिया आणि फिलीपिन्स यांसारख्या अनेक देशांमध्येही प्रवेश मिळू शकतो. मात्र, लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे शेंगेन व्हिसाद्वारे आयर्लंड आणि युनायटेड किंगडम (यूके) मध्ये प्रवेश करता येत नाही.
शेंगेन व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रवासाच्या तारखेपासून किमान 3 महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट
ये-जा करण्याची फ्लाइट तिकिटे
हॉटेल बुकिंगचा पुरावा
किमान 30,000 युरो कव्हर असलेले ट्रॅव्हल इन्शुरन्स
मागील 3 ते 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
मागील 2 ते 3 वर्षांचे आयटीआर
अर्ज कुठे करावा?
जर आपण एखाद्या विशिष्ट देशात सर्वाधिक दिवस मुक्काम करणार असाल, तर त्या देशाच्या दूतावासात शेंगेन व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. जर सर्व देशांमध्ये जवळपास समान कालावधीसाठी मुक्काम करण्याचा विचार असेल, तर ज्या देशातून आपण प्रथम प्रवेश घेणार आहात, त्या देशाच्या दूतावासात अर्ज करणे आवश्यक आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
योग्य नियोजन आणि संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास शेंगेन व्हिसा केवळ युरोपच नव्हे, तर अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांचे दरवाजे खुले करू शकतो. त्यामुळे परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा व्हिसा मोठी संधी मानली जात आहे.
Web Summary : The Schengen visa allows entry into 29 European countries, including France, Germany and Spain. It also grants visa-free entry to some non-European nations. Application requires a valid passport, flight tickets, hotel booking proof, travel insurance, bank statements, and ITRs. Apply at the embassy of your main destination.
Web Summary : शेंगेन वीज़ा फ्रांस, जर्मनी और स्पेन सहित 29 यूरोपीय देशों में प्रवेश की अनुमति देता है। यह कुछ गैर-यूरोपीय देशों के लिए वीज़ा-मुक्त प्रवेश भी प्रदान करता है। आवेदन के लिए एक वैध पासपोर्ट, उड़ान टिकट, होटल बुकिंग प्रमाण, यात्रा बीमा, बैंक स्टेटमेंट और आईटीआर की आवश्यकता होती है। अपने मुख्य गंतव्य के दूतावास में आवेदन करें।