शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इथे आहे ११०० वर्ष जुनं सासू-सुनेचं मंदिर, कधीकाळी मुघलांनी केलं होतं बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:18 IST

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का?

तुम्ही तशी तर भगवान शिवा, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान गणेशाची वेगवेगळी मंदिरे पाहिली असतील. पण कधी तुम्ही सासू-सुनेचं मंदिर पाहिलंय का? तुम्हाला नक्कीच अशाप्रकारच्या मंदिराबाबत जाणून घेऊन आश्यर्य वाटेल. हे मंदिर राजस्थानच्या उदयपूरमध्ये आहे. आणि या मंदिराच्या निर्माणाची कथाही फारच रोमांचक आहे. 

सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. या मंदिरात भगवान विष्णु आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. सुनेचं मंदिर सासूच्या मंदिरापेक्षा थोडं लहान आहे. १०व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या मंदिराला अष्टकोनी छत आहे. मंदिराच्या भींतींवर रामायणातील वेगवेगळ्या घटना कोरल्या आहेत. मूर्तींना दोन भागात अशाप्रकारे व्यवस्थित ठेवण्यात आलं आहे.

सासू-सुनेच्या या मंदिरात एकाच मंचावर त्रिमुर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णु आणि महेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे. तर दुसऱ्या मंचावर राम, बलराम आणि परशुरामाचे चित्र आहे. असे म्हणतात की, मेवाड राजघराण्याच्या राजमातेसाठी भगवान विष्णुचं मंदिर आणि सुनेसाठी शेषनागाचं मंदिर तयार केलं होतं. सासू-सुनेसाठी हे मंदिर तयार करण्यात आलं असल्यानेच या मंदिराला सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. 

असं मानलं जातं की, ११०० वर्षांपूर्वी या मंदिराचं निर्माण राजा महिपाल आणि रत्नपाल यांनी केलं होतं. राजमाता या भगवान विष्णुच्या भक्त होत्या त्यामुळे आधी भगवान विष्णुचं मंदिर तयार करण्यात आलं. त्यानंतर राजा महिपाल यांचं लग्न झालं. राजा महिपालाच्या पत्नी या भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी भगवान शिवाचं मंदिर तयार करण्यात आलं. 

सासू-सुनेचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात भगवान विष्णुची ३२ मीटर उंच आणि २२ मीटर रूंद प्रतिमा आहे. या प्रतिमेला हजारो भूजा आहेत. त्यामुळे हे मंदिर सहस्त्रबाहु मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. भगवान विष्णु आणि भगवान शिवाच्या मंदिराच्या मधे एक भगवान ब्रम्हाचंही एक मंदिर आहे. 

अशीही एक मान्यता आहे की, इथे सर्वातआधी भगवान श्रीकृष्णाचं मंदिर बांधण्यात आलं होतं. यातील प्रतिमेला हजारो बाहु आहेत. कालांतराने सहस्त्रबाहु या शब्दाची फोड करून लोक या मंदिराला सास-बहू मंदिर म्हणू लागले. 

असेही म्हटले जाते की, या मंदिराच्या जवळपासच मेवाड राजवंशाची स्थापना झाली होती. असे म्हणतात की, या परिसरावर जेव्हा मुघलांनी ताबा मिळवला होता तेव्हा हे मंदिर वाळू आणि चुन्याच्या मदतीने बंद केलं होतं. मात्र नंतर जेव्हा इंग्रजांनी इथे ताबा मिळवला हे मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सRajasthanराजस्थान