(Image Credit : wanderlustchloe.com)
जगाच्या अनेक भागांमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना निसर्गाचं खास वरदान मिळालं आहे. असंच एक खास पर्यटन स्थळ म्हणजे दक्षिण अमेरिकेतील देश चिलीमधील वेलेड डे ला लूना. तुम्ही जर एकदा इथे भेट द्याल तर आयुष्यभर हे ठिकाण तुमच्या स्मरणात राहणार. येथील दगडांना निसर्गाने अशाप्रकारे आकार दिलाय की, त्यांच्या प्रेमात पडावं. इथे गेल्यावर तुम्हाला एखाद्या वेगळ्या ग्रहावर गेल्याचा अनुभव येऊ शकतो.
अटाकामा मरूस्थलपासून साधारण १३ किलोमीटर दूर असलेल्या या ठिकाणाला व्हॅली ऑफ मून असं म्हटलं जातं. याचं कारण हे आहे की, इथे पौर्णिमेचा सुंदर चंद्र डोळ्यात सामावून घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. इथे एक कोरडा तलाव आहे, ज्याने येथील सुंदरतेत आणखी जास्त भर पडते.
निसर्गाची अद्भूत सुंदरता
इथे डोंगरांच्या मधून दिसणारा पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यावर असं वाटतं की, जणू एखाद्या चित्रकाराने काढलेली पेंटिंग आपण बघतोय. येथील डोंगरांना साल्ट माउंटेन असं म्हटलं जातं. इथे आलेल्या पुरामुळे आणि हवेमुळे येथील मातीचा रंग फारच आकर्षक झाला आहे. असं वाटतं जणू एखाद्या पेंटिंगमध्ये वेगवेगळ्या रंगाची माती भरलीये.
कसे पोहोचाल?
चिलीची राजधानी सेंटियागोपासून हे ठिकाण फार दूर आहे. राजधानीपासून येथे पोहोचण्यासाठी साधारण १७०० किमीचा प्रवास करावा लागतो. पण जर तुम्ही दिल्लीहून बोलिविया के ला पाज शहरापर्यंत विमानाने गेलात तर येथून वेले डे ला लूना केवळ ६ मैल अंतरावर आहे.
कुठे थांबाल?
वेले डे ला लूना मुख्य स्थळापासून दूर आहे. त्यामुळे इथे मोठी हॉटेल्स नाहीत. इथे आजूबाजूला ३ हजारात तुम्हाला साधारण हॉटेल्स मिळतील. येथून ११ किलोमीटर अंतरावर तुम्हाला चांगलं हॉटेल मिळेल.