शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इथं काळही थांबला; या शहरातल्या ऐतिहासिक वास्तू पाहाल, तर भूतकाळात हरवून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 16:46 IST

प्राग युरोपमधील रोमॅन्टीक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराचा समावेश जगभरातील सर्वात सुंदर शहरांमध्ये करण्यात येतो. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकं असलेलं हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं.

प्राग युरोपमधील रोमॅन्टीक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराचा समावेश जगभरातील सर्वात सुंदर शहरांमध्ये करण्यात येतो. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकं असलेलं हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. संगीत आणि कलात्मक गोष्टींचा वारसा लाभलेलं प्राग अनेक वास्तूशिल्प, बगिचे आणि उद्यानांसाठी प्रसिद्ध आहे. यूरोपमधील चेक रिपब्लिकमधील प्राग हे शहर आपल्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीसाठी पर्यटकांमध्ये चांगलंच लोकप्रिय आहे. दरवर्षी इथे साधारण ४० लाख पर्यटक भेट देतात. कारण इथे फिरण्यासोबतच अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आणि त्याची सहभागी होण्याची संधी पर्यटकांना देतं.

जर तुम्हीही प्रागला भेट देणार असाल तर येथील प्रसिद्ध चार्ल्स ब्रिजला भेट द्यायला विसरू नका. हा प्रागमधील सर्वात जुना ब्रीज असून या ब्रीजवरून वल्तावा नदीवरील सुंदर दृश्य पाहता येतात. हा ब्रीज 1700 फुट लांब आहे. हा ब्रीज चार्ल्स चतुर्थ यांनी बांधला आहे. या ब्रीजव्यतिरिक्त तुम्ही प्रागमध्ये सेस्की क्रूमलोव कॅसल नक्की पाहा. प्राग शहराच्या मध्यावर 600 वर्ष जुनं घड्याळ असून आजही ते अगदी तंतोतंत वेळ दाखवत आहे. 

सेस्की क्रूमलोव चेक गणराज्याचे एक शहर आहे. जे प्रागपासून काही अंतरावर असून जर तुम्ही प्रागमध्ये जाणार असाल तर जवळच असलेल्या सेस्की क्रूमलोव येथही नक्की जा. प्रागबाबत असं सांगण्यात येतं की, हे शहर संगीत आणि कला यांसारख्या कलांसाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त प्रागमध्ये जगातील चवीला सुंदर असलेली बीयर तयार करण्यात येते. येथील पुरातन वास्तू फिरण्यासाठी उत्तम आहेत. येथे क्रूजची सफर, पारंपारिक भोजनासोबतच प्राग कॅसल, द जॉन लेनन वॉल आणि चार्ल्स ब्रीजचा आनंद घेण्यात येतो.

 प्राग पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे कारण येथे फिरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. येथे वास्तूशिल्प, कलात्मक गोष्टी, शांत आणि हिरवेगार बगिचे, देशी बीयर, खाण्याच्या गोष्टी आणि शॉपिंग यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही या शहरामध्ये शाही महाल, कॅथेड्रल, चर्च, मठ, टॉवर आणि नक्षीकाम केलेले शहराचे रस्ते यांचा आनंद घेवू शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन