केरळ म्हणजे, गॉड्स ओन कंट्रि... या राज्यातील ठिकाणंही फार सुंदर असून असचं सुंदर ठिकाण म्हणजे, पूवार. तुम्ही येथे वेगवेगळ्या अॅडव्हेंचर्सचा आनंद घेऊ शकता. कपल्ससाठी हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. पार्टनरसोबत वॉटर स्पोर्ट्सची मस्ती असो किंवा क्रूझची सैर असो येथे तुम्ही वेगवेळ्या अॅडव्हेंचर्सचा आनंद घेऊ शकता. एवढचं नाही येथे आयुर्वेदिक पद्धतीने करण्यात येणारी रिलॅक्स थेरेपी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जाण्यासाठी रोमॅन्टिक प्लेसच्या शोधात असाल तर पूवार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
पूवार बीच आहे सर्वात सुंदर
पूवारमध्ये कपल्ससाठी फेमस एक बीच आहे. येथे तुम्ही फ्लोटिंग कॉटेजचा आनंद घेऊ शकता. म्हणजेच, तुम्ही येथे पाण्यावर तरंगणाऱ्या कॉटेजवर राहू शकता. पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याच्या खळखळणाऱ्या आवाजासोबत तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता.
कोझिपपारालाही भेट देऊ शकता
कोझिपपारा हे ठिकाण सुंदर जंगलं आणि नद्यांसाठी ओळखलं जातं. याव्यतिरिक्त ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त येथए तुम्ही वाइल्डलाइफचाही आनंद घेऊ शकता.
कसे पोहोचाल?
पूवारला जाण्यासाठी जर तुम्ही रेल्वेमार्गाने जाणार असाल तर तुम्हाला परस्सला रेल्वे स्टेशनवरून पोहचू शकता. येथून पूवार जवळपास 9 किलोमीटर आहे. जर तुम्ही तुमची बसने जाण्याचा विचार करत असाल तर येथील जवळचं बस स्टॅन्ड नॅयाटिकरा आहे. येथून पूवारपर्यंतचं अंतर 10 किलोमीटर आहे.
जर तुम्ही विमानमार्गे जाणार असाल तर तिरूअनंतपूरम इंटरनॅशनल एयरपोर्टवरून जाऊ शकता. येथून पूवारपर्यंतच अंतर 126 किलोमीटर आहे.