शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलो ट्रिपसाठी प्लॅनिंग करताय? 'हे' डेस्टिनेशन ठरु शकतं बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 12:37 IST

एकट्याने फिरायला जाणं तसं फार चॅलेंजींंग काम आहे. पण काही लोकांना वेगळा अनुभव घेण्यासाठी सोलो ट्रिप करायची असते.

एकट्याने फिरायला जाणं तसं फार चॅलेंजींंग काम आहे. पण काही लोकांना वेगळा अनुभव घेण्यासाठी सोलो ट्रिप करायची असते. सोलो ट्रिपमध्ये तुम्ही आपल्या मनाने जगू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणांचा मनमुराद आनंद घेऊ शकता. सोबतच सोलो ट्रिपने तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो. अशाच सोलो ट्रिपचं तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर पुष्करला भेट देऊ शकता. १६ नोव्हेंबरपासून पुष्कर जत्रेला सुरुवात होत आहे आणि हे ठिकाण सोलो ट्रिपसाठी बेस्ट मानलं जातं. महत्त्वाची बाब म्हणजे इथे तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम, अॅडवेंचर अॅक्टिविटी आणि वेगवेगळ्या स्पर्धांचाही आनंद घेता येतो.  

पुष्कर हे धार्मिक स्थळ असलं तरी इथे केवळ बघण्यासाठी मंदिरेच आहेत, असं नाही. ट्रेकिंग पासून ते हॉट एअर बॅलूनिंग आणि क्विड बायकिंगसारख्या रोमांचक गोष्टीही तुम्ही इथे करु शकता. 

फिरण्यासाठी आणखी काय?

सावित्री लेक

पुष्करला आल्यावर रत्नागिरी डोंगरावर स्थित सावित्री मंदिराला नक्की भेट द्या. कारण येथून दिसणारा नजारा केवळ फिरण्यासाठी आणि कॅमेरात कैद करण्यासाठीच नाही तर मनाला शांतता मिळवण्यासाठीही खास आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रोप वे ची सुविधा आहे. पण अॅडवेंचर म्हणून तुम्ही ट्रेकिंगचा पर्यायही निवडू शकता. 

अनासागर लेक

अनासागर लेकमुळे पुष्करच्या सुंदरतेत दुपटीने भर पडते. सायंकाळी लेकचा नजारा फार सुंदर दिसतो. या तलावात तुम्ही बोटींगचा आनंदही घेऊ शकता. त्यासोबतच आजूबाजूचे अनेक लोकल स्ट्रीट फूड्सही चाखू शकता.  

तारागढ किल्ला

राजस्थानच्या अजमेरमधील चौहान शासकांद्वारे तयार करण्यात आलेला तारागढ किल्लाही सुंदर आहे. हा किल्ला जगातल्या सर्वात जुन्या डोंगरातील किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन तासांचा प्रवास करावा लागतो, पण या प्रवासात तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. 

अजमेर

अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह हा अजमेर शरीफ या नावानेही ओळखला जातो. इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. सर्वधर्म समभावाचं हे मूर्तिंमंत उदाहरण आहे. 

खिमसर किल्ला

राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात खिमसर हा किल्ला आहे. हा किल्ला थार वाळवंटाच्या फार जवळ आहे. १६व्या शतकात तयार करण्यात आलेल्या या किल्ल्यात राजपूत वास्तुकलेचा अद्वितीय असा नजारा बघायला मिळतो. आता हा किल्ला हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आलं आहे. ११ एकर परिसरात पसरलेली बाग या किल्ल्याचं खास आकर्षण आहे. 

कसे पोहोचाल?

विमान मार्गे - जयपूरचं सांगनेर हे पुष्करचा पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. येथून पुष्करचं अंतर १४६ किमी आहे. एअरपोर्टहून इथे पोहोचण्यासाठी टॅक्सी करु शकता. 

रेल्वे मार्ग - पुष्कर हे टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन अजमेर रेल्वे स्टेशनसोबत जोडलेलं आहे.  

रस्ते मार्ग - पुष्करसाठी जयपूर, जोधपूर आणि अजमेर येथून सतत बसेस सुरु असतात. यात्रेदरम्यान इथे वाहतूकीसाठी आणखी जास्त सुविधा केली जाते.  

टॅग्स :tourismपर्यटनRajasthanराजस्थान