शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतातल्या मंदिरांचं वैभव अनुभवायचं असेल तर ओडिशाला जायलाच हवं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 18:42 IST

भारताच्या पूर्व किनाºयावर वसलेलं ओडिशा हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.

ठळक मुद्दे* परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे.* लिंगराज मंदिर हे ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे.* केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. इथल्या उदियगरी आणि खंदिगरी गुंफा प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.

- अमृता कदमआपण जेव्हा फिरायला जाण्याचा बेत करतो तेव्हा फार कमीजणं असतील जे आवर्जून ओडिशाला जाण्याचा विचार करत असतील. पर्यटनाच्या नकाशावर अजूनही फारसं ठळक झालं नसल्यानं इथे नेमकं पहायचं काय असा प्रश्नही पडू शकतो. पण भारताच्या पूर्व किना-यावर वसलेलं हे राज्य प्रसिद्ध आहे इथल्या मंदिरांसाठी. वैशिष्ट्यपूर्ण संगीत आणि नृत्यशैलीसाठी. आणि हो, सी फूडसाठीही. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर ‘टेम्पल कॅपिटल’ म्हणूनच ओळखली जाते.असं म्हणतात की सातव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान या शहरामध्ये तब्बल 7000 मंदिरं होती. आज मात्र इथे अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढीच मंदिरं आहेत.परशुरामेश्वराचं मंदिर हे भुवनेश्वरमधलं सर्वांत जुनं मंदिर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. इसवी सन 650 मध्ये हे मंदिर बांधलं गेलं. या मंदिराचा कळस मधाच्या पोळ्याच्या आकाराचा आहे. मंदिरासमोर विशाल प्रांगण आहे. प्रवेशद्वारावर आठ ग्रह कोरलेले आहेत. नंतरच्या काळात या मालिकेत नववा ग्रहही आला.

 

मुक्तेश्वर मंदिरया मंदिराची उभारणी दहाव्या शतकात करण्यात आली. इथल्या भिंतींवर देवी-देवतांच्या चित्रांसोबतच धर्मग्रंथातले प्रसंग आणि मंदिरातलं दैनंदिन धार्मिक कार्य यासंबंधीची चित्रंही कोरली आहेत. या मंदिराची रचना कलिंग स्थापत्यशैलीमधली आहे.इथल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या काळातली ही मंदिरं वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचं दर्शन आपल्याला घडवतात. इतिहास आणि वास्तुशास्त्राचे जाणकार नसाल तरी या मंदिरांचं स्थापत्य तुमचं मन आकर्षून घेतात.भुवनेश्वरमधलं अजून एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे कोटीतीर्थेश्वर मंदिर. 

 

लिंगराज मंदिरहे ओडिशातलं सर्वांत प्रसिद्ध मंदिर. हे हरिहराचं मंदिर आहे. हे मंदिर भुवनेश्वरमधलं सर्वांत मोठं मंदिर आहे. किंबहुना हा मंदिरांचा समूह आहे. मुख्य मंदिराच्या कळसाची उंची तब्बल 55 मीटर एवढी आहे. यावरूनच इथल्या मंदिरांच्या भव्यतेची कल्पना यावी. सध्या आपण जे मंदिर पाहतो, ते अकराव्या शतकातलं आहे. पण मूळ मंदिराच्या उभारणीची सुरूवात ही सहाव्या शतकात झाली. काही संस्कृत ग्रंथातील उल्लेखानुसार ती सातव्या शतकात झाली. कलिंग शैलीतलं हे मंदिर एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.इथल्या मंदिरांसोबतच जोडलं गेलेलं पवित्र नाव म्हणजे बिंदुसागर तलावाचं. या तलावाशी अनेक दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. तहानलेल्या पार्वतीला पाणी प्यायला मिळावं म्हणून शंकराने जमिनीत त्रिशूळ मारला आणि तिथे एक झरा उत्पन्न झाला. या झ-यातूनच बिंदुसागर तलावाची निर्मिती झाली.या झ-याच्या जवळच अनंत वासुदेव मंदिर आहे. भगवान विष्णुचं हे मंदिर 13 व्या शतकात गंग राजघराण्यातल्या राणी चंद्रिकाने बांधलं. या मंदिराचा जीर्णोद्धार मराठ्यांनी केला. मंदिर विष्णुचं असलं तरी त्याचं स्थापत्य हे बरंचसं लिंगराज मंदिरासारखंच आहे.

 

अनंत वासुदेव मंदिरामध्ये बनणा-या प्रसादाचंही खास वैशिष्ट्य आहे. मातीच्या भांड्यांमध्ये बनवल्या जाणा-या या प्रसादामध्ये बटाटा किंवा इतर कोणतीही परदेशी भाजी वापरली जात नाही. इतकंच नाही तर त्या त्या मौसमात न पिकणा-या भाज्याही इथल्या प्रसादात वापरत नाहीत. म्हणजे इथला प्रसाद बनवणं किती अवघड काम आहे, याचा विचार करा. केवळ अनंत वासुदेवच नाही, तर ओडिशातल्या अनेक मंदिरात ही पद्धत आहे.केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माशी संबंधित ठिकाणंही इथे आहेत. इथल्या उदियगरी आणि खंदिगरी गुंफा प्रसिद्ध आहेत. जैन स्थापत्यशैलीच्या या गुंफा अगदी प्राचीन उदाहरणं आहे.ही फक्त भुवनेश्वरमधली मंदिरं आहेत. ओडिशाचा विचार केला तर पुरीचं जगन्नाथ मंदिर आणि युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेलं कोणार्कचं सूर्यमंदिरही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.एकूणच ओडिशा किंवा भुवनेश्वरची तुमची ट्रीप ही केवळ धार्मिक पर्यटन नसेल तर समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा समजून घेण्याचाही एक प्रयत्नही असेलत्यामुळे पुढच्या वेळेस ट्रीप प्लॅन करताना ओडिशाचा विचार आवर्जून करा.