शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

भारतातील 'ही' 4 अद्भूत ठिकाणं तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 15:59 IST

सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून तुम्हीही कुठेना कुठे फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल. आपल्यापैकी प्रत्येकजण यूरोप, लंडन अशा परदेशातील ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असतात.

सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून तुम्हीही कुठेना कुठे फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल. आपल्यापैकी प्रत्येकजण यूरोप, लंडन अशा परदेशातील ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असतात. परंतु याऐवजी तुम्ही आपल्याच देशातील काही हटके ठिकाणांना भेट देऊ शकता. आपल्या देशातही अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासाठी ओळखली जातात. त्यापैकी काही ठिकाणांबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर तुम्हाला विदेशात फिरायला जाण्याची इच्छाच होणार नाही. जाणून घेऊया या हटके ठिकाणांबाबत...

अहमदनगर, निगहोज पॉटहोल्‍स

पुणे-अहमदाबाद रोडच्या जवळ असलेलं हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला इतर ठिकाणी जाण्याची इच्छाच होणार नाही. येथे असणाऱ्या कुकडी नदीवर तयार झालेल्या नॅचरल पॉटहोल्सचं सौंदर्य म्हणजे एक अद्भूत अविष्कारचं. याव्यतिरिक्त बेसॉल्ट रॉक्सवर तयार झालेले कर्व्स आणि बीचवरून वाहणाऱ्या पाण्याचं दृश्य अत्यंत सुंदर आहे. 

उदुपी, मारावंथे

जर तुम्ही कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही उदुपीला भेट देणं अत्यंत गरजेचं आहे. या किनाऱ्यावरील शांतता आणि दूरवर पसरलेला अरबी समुद्र तुमचं मन मोहून टाकेल. येथे तुम्ही विशाल अरबी समुद्र, हिल पॉइंट्स आणि सुपरनिका नदीमध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. 

जामनगर, नरारा मरीन नॅशनल पार्क

गुजरातमधील जामनगरमध्ये असलेल्या नरारा मरीन नॅशनल पार्कमध्ये सी कोरल पाण्याच्या तळाशी अगदी सहज दिसतात. गल्फ ऑफ कच्छच्या जवळ असलेल्या या पार्कमध्ये सी कोरल पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर समुद्राच्या आतील जीवन अनुभवण्यासाठी  हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही सागरी तळाशी असलेल्या जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकता. 

जबलपुर, भेडाघाट

तुम्ही संगमरवराचा वापर करून बांधण्यात आलेल्या अनेक इमारती पाहिल्या असतील परंतु येथे तुम्हाला संगमरवराचे डोंगर पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त येथे एक धबधबादेखील आहे. जो पाहून तुमचं मनंही खूश होऊ शकतं. तुम्ही येथे संगमरवराच्या डोंगररांगामधून वाहणाऱ्या नर्मदा नदीमध्ये बोटींगचा आनंदही घेऊ शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन