(image credit- Trawell.in)
या हिवाळ्यात जर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर कोणताही वेळ न घालवता लगेच तयारीस लागा. मित्रमैत्रींणीसोबत किंवा ऑफिसची मंडळीं जर कुठे जायचा प्लॅन करत असतील तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला थंडीचा आनंद पूर्णपणे लुटता येईल.
भारतात थंडीचा आनंद घेण्यासाठी प्रसिध्द अशी खूप स्थळ आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत जी भारतात वास्तव्यास असलेल्या लोकांना फारशी माहीत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे दार्जिलिंगपासून ५८ किलोमीटरच्या अंतरावर असलेले कलिम्पोंग हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे शहर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. आणि आपल्या मनमोहक निसर्गसौंदर्यासाठी ते प्रसिध्द आहे. हे एक लहानसे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी रहदारी फार कमी असते. त्यामुळे या परीसरात गेल्यानंतर शांतता जाणवते. तसेच या शहराच्या सुंदर नजाऱ्यांसाठी हे शहर आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे.